आॅफिसमध्ये स्नॅक्स जरा दूरच ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2016 12:46 PM2016-05-17T12:46:14+5:302016-05-17T18:16:14+5:30

स्नॅक्स जितके जवळ तेवढी ते जास्त खाण्याची टेंडंसी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते.

Keep snacks in the office quite a bit | आॅफिसमध्ये स्नॅक्स जरा दूरच ठेवा

आॅफिसमध्ये स्नॅक्स जरा दूरच ठेवा

Next
डर्न आॅफिस कल्चरमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुखसुविधांची पुरेपूर काळजी घेतली जाते. ‘एम्प्लॉयी कम्फर्ट’ ही कंपन्यांची पॉलिसी असते.

म्हणून मग कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक कंपन्या फ्री स्नॅक्स आणि कोल्डड्रिंक आॅफिसमध्ये ठेवतात. आता ‘आॅफिस पर्क’ म्हणून हे सर्व ठिक आहे; परंतु कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते.

एका अध्यायनात असे दिसून आले की, जर कामाच्या ठिकाणी स्नॅक्स कर्मचाऱ्यांच्या जवळ ठेवले तर ते अधिक प्रमाणात खाऊन त्यांना लठ्ठपणाची शक्यता जास्त असते. आरोग्यास हानिकारक स्नॅक्स खाल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांचे स्थुलत्व वाढते.

त्यामुळे स्नॅक्स जितके जवळ तेवढी ते जास्त खाण्याची टेंडंसी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते.

अमेरिकेती सेंट जोसेफस् विद्यापीठतील प्राध्यापक अर्नेस्ट बास्किन यांनी माहिती दिली की, स्नॅक्स ठेवण्याची जागा काही फूट दूर जरी केली तर ते खाण्याच्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होताना पाहून आम्ही तर आश्चर्यचकित झालो.

म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आॅफिसमधील फ्री स्नॅक्सची जागा थोडी दूर करणे एवढा सोपा उपाय आहे.

पुरुषांमध्ये चटरपटर खाण्याची सवय महिलांपेक्षा अधिक असते. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अ‍ॅपेटाईट’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. आॅफिसमधील स्नॅक्सचा कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम होतो यावर अभ्यास करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.

Web Title: Keep snacks in the office quite a bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.