सध्या स्ट्रेटनिंगऐवजी केराटिन ट्रिटमेंटचा ट्रेन्ड; जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:47 PM2018-10-28T17:47:32+5:302018-10-28T17:49:17+5:30
सौंदर्यात भर घालण्यासाठी त्वचा आणि केसांवर लक्ष केंद्रीत करण्यात येतं. तजेलदार त्वचा आणि सिल्की-शायनी केस मिळवण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादनं ट्राय करण्यात येतात. पार्लरमध्ये जाऊन अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात.
सौंदर्यात भर घालण्यासाठी त्वचा आणि केसांवर लक्ष केंद्रीत करण्यात येतं. तजेलदार त्वचा आणि सिल्की-शायनी केस मिळवण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादनं ट्राय करण्यात येतात. पार्लरमध्ये जाऊन अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. केस सिल्की आणि स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनिंग आणि केराटिनसारख्या ट्रिटमेंट केल्या जातात. परंतु अनेकदा तरूणी या दोन्ही ट्रिटमेंटमध्ये गोंधळून जातात. मग अनेक लोकांचे सल्ले घेतले जातात. अशातच मनात एक भिती असते की, आपल्या केसांना हे सगळं सूट होईल ना? गोंधळून जाऊ नका. जाणून घेऊयात या स्ट्रेटिनिंग आणि केराटीनमध्ये नक्की काय फरक आहे त्याबाबत...
केराटीन ट्रिटमेंट म्हणजे काय?
प्रदुषणामुले खराब झालेले केस किंवा कोंडा आणि केसांमधील कोरडेपणा दूर करण्यासाठी केराटीन ट्रीटमेंट करण्यात येते. याव्यतिरिक्त वाढत्या वयामध्ये प्रोटीनची कमतरता भासते. यामुळे केस फ्रिजी होतात. अशातच केराटिन ट्रीटमेंट केसांमधील फ्रिजीनेस दूर करून शािन परत मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.
अशी करण्यात येते केराटिन ट्रिटमेंट :
या ट्रिटमेंटमध्ये केसांवर प्रोटिन्सची एक लेयर चढवण्यात येते. त्यावर प्रेसिंग करून केसांवर ते प्रोटिन्स लॉक करण्यात येते. त्यामध्ये 180 डिग्री तापमनावर केसांना प्रेसिंग केली जाते. त्यानंतर 24 तासांनी केसांना पाण्याने धुण्यात येतं. या ट्रिटमेंटनंतर फक्त केराटिनयुक्त शॅम्पूचाच वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यानंतर कंडिशनर 6 ते 7 मिनिटांसाठी लावण्यात येतं. त्यानंतर केसांना स्वच्छ करून ब्लो ड्राय करण्यात येतं.
स्ट्रेटनिंगपेक्षा वेगळी आहे केराटिन ट्रिटमेंट :
- केराटिन आणि स्ट्रेटनिंगमध्ये फार फरक आहे. केराटिन ट्रिटमेंट केसांमधीस फ्रिजीनेस नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तेच स्ट्रेटनिंग कर्ली किंवा वेव्ही केसांना स्ट्रेट करण्यासाठी फायदेशीर असतात.
- केराटिनमध्ये माइल्ड प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु स्ट्रेटनिंगमध्ये हाय केमिकल्सचा वापर करण्यात येतो.
- केराटिन ट्रिटमेंटचा प्रभाव केसांमध्ये 4 ते 5 महिन्यांपर्यंतच राहते. पण स्ट्रेटनिंगचा प्रभाव नवीन केस येईपर्यंत तयाच राहतो.
या गोष्टी लक्षात घ्या :
- केराटिन ट्रिटमेंटनंतर केसांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यानंतर वेळेवर हे्अर स्पा घेण्याचीही गरज भासते.
- केराटिन ट्रिटमेंटनंतर यानंतर शक्यतो केस बांधणं टाळाव. ही कायमस्वरूपी ट्रिटमेंट नसून केस बांधल्यामुळे त्याचा इफेक्ट निघून जातो.
- केराटिन ट्रिटमेंट करण्याआधी त्याबाबत सर्व माहीती घ्या.
- या ट्रिटमेंटनंतर केस शक्यतो 3 दिवसांपर्यंत धुवू नका. केस धुतल्याने याचा इफेक्ट कमी होतो.
- आपल्या केसांना 48 तास अजिबात बांधू नका. शक्य असल्यास केस बांधण्यासाठी रबरचा वापर करू नका.