या फळाने वर्षानुवर्ष टिकेल तुमचं तारुण्य, सुरकूत्यांची समस्या होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:22 PM2019-12-17T12:22:46+5:302019-12-17T12:35:28+5:30
हिवाळ्यात सुंदर चमकदार त्वचा सगळ्यांनाच हवी असते.
हिवाळ्यात सुंदर चमकदार त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण वातावरणात होणारा बदल, प्रदूषण, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यांमुळे शरीरावर नकारात्मक परीणान घडून येत असतात. तसंच चेहऱ्याला पुळकुट्या येणं, मुरूमं येणं, त्वचा निस्तेज होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्हालाही त्वचेच्या या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या या फळाचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ड्रॅगन फ्रुटचे त्वचेला होणारे फायदे.
ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे चांगला उपाय आहे. यात भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह आढळून येते.
त्वचेवर तयार होणारे फ्रि रेडिकल्स चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करतात. तसंच वयवाढीची लक्षणं सुध्दा दिसायला सुरूवात होते. यासाठी ज्या घटकांमध्ये अॅन्टी ऑक्सीडंटस असतात. अशा फळांचा आहारात समावेश करावा. तसंच ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी ऑक्सीडंटस आढळून येतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकूत्या नियंत्रणात राहतात. त्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रुटचं सेवन करण्याव्यतिरीक्त त्याचा फेसपॅक सुध्दा चेहऱ्याला लावू शकता.
यासाठी ड्रॅगन फ्रुटमध्ये मध घालून फेसपॅक बनवून घ्या. आणि नियमीत चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकूत्या कमी होतात. तसंच त्वचा चमकदार दिसेल. वेळे आधीच चेहरा जास्त वयस्कर दिसायला लागत असेल तर हा फेसपॅक वापरल्यास फरक दिसून येईल.
ड्रॅगन फ्रुटचा फेसपॅक तयारसाठी ड्रॅगन फ्रुट कापा. त्यानंतर त्यामधिल प्लप काढून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्यात दही घाला आणि हे मिश्रण एकत्र करून घ्या. अशाप्रकारे ड्रॅगन फ्रूटचा फेसपॅक तयार करुन झाल्यानंतर मान आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. २ आठवडे हा प्रयोग केल्यानंतर त्वचेत फरक दिसून येईल.
(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)