तुम्हाला माहितही नसतील अशा समस्या होतील राईच्या तेलाने दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 04:11 PM2019-12-19T16:11:21+5:302019-12-19T16:23:39+5:30

राईचं तेल जेवणात वापरणं जितकं आरोग्यासाठी फायदेशीर असतं तितकंच ते त्वतेसाठी सुध्दा असतं.

Know the advantages of mustard oil | तुम्हाला माहितही नसतील अशा समस्या होतील राईच्या तेलाने दूर

तुम्हाला माहितही नसतील अशा समस्या होतील राईच्या तेलाने दूर

googlenewsNext

राईचं तेल जेवणात वापरणं जितकं आरोग्यासाठी फायदेशीर असतं तितकंच ते त्वतेसाठी सुध्दा असतं. पण काही लोकांना राईच्या तेलाचा वास सहन होत नाही. राईच्या तेलाला येणारा वास हा जास्त तीव्र असल्यामुळे अनेक लोकांना सहन होत नाही. त्वचेवर राईच्या तेलाने मसाज केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घेऊया राईच्या तेलाचे त्वचेला होणारे फायदे.


एलर्जीपासून बचाव

राईच्या तेलात अ‍ॅन्टी ऑक्सीड्स असतात त्यामुळे राईच्या तेलाने रोज अंगाची मसाज केल्यास फंगल इन्फेक्शन, त्वचेची आग होणे. तसंच खाज येण्याची समस्या उद्भवणार नाही. 


पचनाचे आजार दूर होतात. 

दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात. सगऴ्यांना अ‍ॅसिडीटीचा त्रास असतो. त्यामुळे आहारात मोहरी वापरल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण पोट व्यवस्थित साफ न झाल्यास त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

त्वचेचा रंग उजळतो. 

(image credit- toi)

त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल. राईचे तेल शरीराला लावल्यास स्किनवर मॉइश्चरायजरचे काम करते. यांमुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत नाही.


 (image credit- nyka)

हिवाळ्यात टाचांना भेगा पडत असतात. तुमच्याही टाचांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही राईचे तेल भेगांना लावल्यास आराम मिळेल. तसंच सांधेदुखी किंवा ओठ फुटल्याची समस्या जाणवत असेल तर तर तुम्ही राईच्या तेलाने यापासून सुटका मिळवू शकता.

Web Title: Know the advantages of mustard oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.