केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या खाण्याच्या पानांमुळे होतील दूर, असा करा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:26 AM2019-12-16T11:26:36+5:302019-12-16T11:31:07+5:30

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही.

know the benefits of betel leaves for hair and skin | केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या खाण्याच्या पानांमुळे होतील दूर, असा करा वापर...

केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या खाण्याच्या पानांमुळे होतील दूर, असा करा वापर...

Next

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे त्वचा कोरडी पडायला सुरूवात होत आहे. तसंच केस सुध्दा भरपूर प्रमाणात गळतात. या सगळ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादनं वापरायला सुरूवात करतो. त्यात कोल्ड क्रिम पासून, बॉडी लोशन यांसारख्या उत्पादनांचा समावेश असतो. पण एव्हढं सगळं वापरून सुध्दा मनासारखी त्वचा आपल्याला मिळत नाही. कारण दररोज कामासाठी बाहेर पडत असताना तसच ऑफिसला  जात असताना प्रत्येकाला आकर्षक दिसावसं वाटतं असतं. जर तुम्हाला सुध्दा असं वाटत असेल. सहज उपलब्ध होत असलेल्या खाणाच्या पानांचा वापर  अनेक प्रकारे करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.


केस गळणं थांबतं

जर तुमचे केस गळत असतील तर खाण्याच्या पानांचा वापर करून तुम्ही केस गळणं थांबवू शकता. त्यासाठी खाण्याची पानं आधी धुवून घ्या. त्यानंतरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर या पानांना तिळाच्या किंवा नारळाच्या तेलात मिक्स करून केसांच्या मुळांना लावा. एक तास राहू द्या त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातुन दोनवेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. 

पिंपल्स दूर होतात. 

खाण्याच्या पानात अ‍ॅन्टी बॅक्टिरीयल गुण असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, तसंच मुरुमं निघून जाण्यास मदत होते. यासाठी खाण्याची पानं पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पानं दळून घ्या. दळून झाल्यानंतर त्याच हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दिवसातून दोनवेळा हा प्रयोग केल्यास पिंपल्सची समस्या दूर होईल. 

शरीराची दुर्गंधी दुर करते.

दिवसभर घराबाहेर असाल किंवा प्रवास करत असाल तर खूप घाम येतो. अशावेळी अंगाला येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात या पानांचं तेल घातल्यास ही समस्या उद्भवणार नाही. 


खाजेपासुन आराम मिळतो.

हिवाळ्यात त्वचेवर खूप खाज येते. खाजेपासून सुटका करण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. यासाठी पाण्यात ९ ते १० पानं घालून उकळून घ्या. मग ते पाणी अंघोळीसाठी वापरा. असे केल्यास त्वचेची खाजेपासून सुटका होईल. 

Web Title: know the benefits of betel leaves for hair and skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.