प्रियांका चोप्रा सुद्धा करते 'हे' इलेक्ट्रिक फेशियल, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:49 PM2020-03-05T15:49:04+5:302020-03-05T15:50:10+5:30
अगदी १० ते १२ मिनिटात होत असलेली इलेक्ट्रिक फेशियल थेरेपी कशी असते वाचा.
आपल्या घरातील अनेक मोठी माणसं असं म्हणतात की चेहरा नाही तर सुंदरता ही मनातून असायला हवी. पण सध्याच्या काळात प्रदूषणाचा सामना करत असाताना दिसून येतं. की रंग कसाही असो स्किन डॅमेज होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सगळयाच वयोगटात ही समस्या जाणवते.
बाजारात अनेक महागडी उत्पादनं आली आहेत. या उत्पादनांचा वापर करून सुद्धा हवा तसा ग्लोईंग चेहरा मिळत नाही. पण या महागड्या प्रोडक्टसच्या तुलनेत इलेक्ट्रिक फेशियलचा वापर करून चेहरा उजळदार बनवू शकता. या पध्दतीचा वापर करून तुम्ही फक्त १० ते १२ मिनिटात चेहरा सुंदर बनवू शकता.
पाश्चिमात्य देशात या टेक्निकचा वापर सर्वाधिक केला जात होता. जेनिफर एनिस्टन, ईवा मेडिंस, मार्गोट रॉबी, सँड्रा बुलॉक आणि प्रियंका चोप्रा जोनास हे स्टारर्स पण या टेक्निकचा वापर करतात. तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रीक फेशियलचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर हे नक्की वाचा
इलेक्ट्रिक फेशियलची ट्रिटमेट करताना त्वचेवर फेस जेल लावलं जातं. नंतर एखाद्या मास्कप्रमाणे ही ट्रिटमेंट काम करत असते. त्यानंतर एका मोबाईलएपच्या माध्यामातून डिव्हाईसला सिंक केलं जातं. या फेशियलमध्ये २ ते १२ मिनिटांपर्यंत फेशियलची सुविधा देण्यात आली आहे.
(image credit- biglemon.am)
चार मिनिटांचे फेशियल काहीवेळातच त्वेचला सुंदरता देण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी काम करत असतं. १२ मिनिटांचे फेशियल त्वचेवरील सुरकुत्या आणि आणि वय वाढीच्या खुणा काढून टाकण्यासाठी वापरलं जातं.
नॅनोकरंट कोलोजन उत्पादनांसाठी फायदेशीर असं हे फेशियल आहे. एंटी-ऑक्सीडेंटच्या स्वरूपात या फेशियलचा वापर केला जातो. या टेक्निकमध्ये माइक्रोकरंट आणि रेडियो फ्रीक्वेंसीचा सुद्धा वापर केला जातो. ( हे पण वाचा-फक्त २ रूपयांच्या तुरटीने मिळवा काळेभोर केस, पांढऱ्या केसांची कटकट होईल दूर...)
म्हणूनच नेहमी ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी किंवा लग्नाला आणि पार्टिला जाण्याआधी कोणत्याही क्रिमवर पैसे घालवण्यापेक्षा या फेशियलचा वापर करून त्वचेच्या समस्यांना रोखू शकता. सतत ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेर पडत असताना त्वचेमुळे जास्त वयस्कर वाटू नये किंवा त्वचा खराब दिसू नये म्हणून इलेक्ट्रिक फेशियल करायला विसरू नका. ( हे पण वाचा-टुथपेस्टसोबत 'या' गोष्टी त्वचेवर लावाल, तर ब्लीच, फेशियल करणंच विसरून जाल...)