फक्त खाण्यासाठी नाही तर केसांसाठीसुद्धा फायदेशीर मायोनीज, जाणून घ्या वापर कसा कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:48 PM2019-12-25T16:48:37+5:302019-12-25T16:53:14+5:30
आपल्या केसांशी निगडीत असणारी एक गोष्ट म्हणजे केस हे कधीच एकसारखे नसतात तसंच आपल्याला हवे तसे केस कधीत नसतात.
आपल्या केसांशी निगडीत असणारी एक गोष्ट म्हणजे केस हे कधीच एकसारखे नसतात तसंच आपल्याला हवे तसे केस कधीत नसतात. कारण बदलते वातावरण आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदुषण यांमुळे आपली त्वचा तसेच केस खूप खराब होत जातात. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे तसंच खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या दैनंदीन जीवनात येत असतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ज्या मायोनीजचा वापर तुम्ही सॅण्डवीचमध्ये खाण्यासाठी करता त्याच मायोनीजचा वापर केसांसाठी केलात तर फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया केसांच्या समस्येपासून वाचण्यासाठी कसा करायचा मायोनिजचा वापर.
सर्वसाधारणपणे केसांना फाटे फुटणे म्हणजेच केस दोन भागांमध्ये विभागले जातात. त्यामुळेच केस गळण्याची समस्या वाढते. जर तुम्ही दुभंगलेल्या केसांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला केस कापावे लागू शकतात. मायोंनीजचे केसांना अनेक फायदे आहेत. मायोनीजमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक घटक असतात. तसंच केसांना फाटे फुटले असतील. तर मायोनीजचा वापर फायदेशीर ठरतो. केसांना मजबूती मिळण्यासाठी तसंच केसांना गळण्यापासून रोखण्यासाठी मायोनीजचा वापर करू शकता.
मेयोनीज आणि एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही केसांसाठी उपयुक्त असणारा हेअरमास्क तयार करू शकता. त्यासाठी १ चमचा एलोवेरा जेल मध्ये ३ चमचे मायोनिज घाला आणि हे मिश्रण केसांना लावा आणि एका तासासाठी सोडून द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
मायोनीज आणि बदामाचं तेल मिक्स करुन लावल्याने केस सॉफ्ट राहतात. त्यासाठी मास्क तयार करण्यासाठी मायोनीज आणि बदामाचं तेल आणि त्यात ३ अंडी मिक्स करा. आणि हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर एक तासाने केस शॅम्पूने धुऊन टाका. असे केल्यास फरक दिसून येईल. तसंच फाटे असणारे केस व्यवस्थीत दिसायला लागतील.