खरं की काय? त्वचा आणि केसांसाठी फायद्याचं असतं घाम येणं, कसं ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:05 PM2020-02-25T17:05:36+5:302020-02-25T17:06:11+5:30

तुमचा मुड जसा असेल त्याप्रमाणेच तुमचा चेहरा दिसत असतो. तुमचा मुड कोलोजन्सना प्रभावित करत असतो. शरीरात एंडोर्फिन सक्रीय होण्यासाठी घाम येणं गरजेचं आहे हा एक हॅप्पी हार्मोन आहे.

Know the benefits of Sweating to hair and skin myb | खरं की काय? त्वचा आणि केसांसाठी फायद्याचं असतं घाम येणं, कसं ते वाचा...

खरं की काय? त्वचा आणि केसांसाठी फायद्याचं असतं घाम येणं, कसं ते वाचा...

Next

हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात सगळयात जास्त हैराण व्हायला होत ते म्हणजे घामाने.  तुमचा विश्वास बसणार नाही पण शरीराला घाम येण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. त्यामुळे शरीरात गुड  हार्मोन्स रिलिज होत असतात. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवले जाते. 

शरीराला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी तसंच केसांना अनेक फायदे मिळवून देण्यासाठी घाम येणं गरजेचं असतं.शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवले जाते. 

शरीरातून घाम येणे किंवा खूप जास्त घाम येणे या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे हायपरिड्रोसिस म्हटले जाते. घाम येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. जर एखाद्या व्यक्तीचं शरीर वेगळ्या प्रकारे काम करत असेल तर त्याला जास्त घाम येतो. तसं पहायला गेलं तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण यामुळे व्यक्तीला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो.  आज आम्ही तुम्हाला शरीरातून निघून येणारा घाम त्वचेसाठी आणि शरीरासाठी कसा फायदेशीर असतो. याबद्दल सांगणार आहे. 

नॅचरल क्लींजरच्या स्वरूपात काम करते. 

जेव्हा तुम्हाला घाम येत असतो. त्यावेळी त्वचेचे पोर्स ओपन होत असतात. शरीरातील विषारी घटक आणि बॅक्टरीया बाहेर पडण्यासाठी घाम येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्कआऊटनंतर चेहरा चांगला स्वच्छ  करणं गरजेचं आहे. किंवा क्लिंजरने चेहरा साफ  करा. घाम आल्यामुळे शरिरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थीत होत. त्यामुळे त्वचा ग्लोईंग दिसते. 

केसांसाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला घाम येत असतो तो  त्वचेसाठीचं नाही तर केसांसाठी सुद्धा फायदेशीर असतो. केसांमध्ये घाम आल्यामुळे स्काल्पची रोमछिद्र बंद होत असतात.  जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी पोषक असतं.  पण जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल तर  शॅम्पूने केस धुणं गरजेचं आहे. दुलर्क्ष केल्यास केसांमध्ये खाज येण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा- फाटलेले ओठ लूक बिघडवत असतील तर, हॉट आणि आकर्षक ओठांसाठी 'या' खास टिप्स)

तुमचा मुड जसा असेल त्याप्रमाणेच तुमचा चेहरा दिसत असतो. तुमचा मुड कोलोजन्सना प्रभावित करत असतो. शरीरात एंडोर्फिन सक्रीय होण्यासाठी  घाम येणं गरजेचं आहे हा एक हॅप्पी हार्मोन आहे. घाम आल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढत असते.  घामामध्ये ९५ टक्के प्रोटिन्स असतात. एका रिसर्चनुसार  डर्मसीडिन घामच्या  ग्रंथिमध्ये असतं. त्यामुळे घाम येत असतो आणि यात मोठ्या प्रमाणावक प्रोटिन्स असतात. ( हे पण वाचा-नाकावरच्या ब्लॅकहेट्समुळे वयस्कर दिसत असाल तर करा 'हे' घरगुती उपाय)

Web Title: Know the benefits of Sweating to hair and skin myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.