त्वचा नेहमी तरूण आणि तजेलदार ठेवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:12 AM2019-08-10T11:12:36+5:302019-08-10T11:18:21+5:30

दुधाची मलाई ही खाण्यासाठी जेवढी चांगली असते, तेवढीच ती त्वचेसाठी फायदेशीर असते.

Know benifits of malai for flawless skin | त्वचा नेहमी तरूण आणि तजेलदार ठेवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय!

त्वचा नेहमी तरूण आणि तजेलदार ठेवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय!

Next

(Image Credit : www.nykaa.com)

मलाई खाण्यासाठी जेवढी चांगली लागते तेवढीच ती त्वचेसाठीही फायदेशीर असते. काही लोक मलाईत जास्त फॅट असल्याने खाण्यास नकार देतात. पण मलाईमध्ये आढळणारे पोषक तत्व आपल्या त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतात. मलाईचे गुण आपली त्वचा सुंदर करण्यासोबतच त्वचेच्या इतरही समस्या दूर करते. चला जाणून घेऊ याचे फायदे...

(Image Credit : India.com)

१) बेस्ट मॉइश्चरायजर - दुधाची साय म्हणजेच मलाई त्वचेसाठी सर्वात चांगलं मॉइश्चरायजर म्हणून काम करते. मलाईने काही मिनिटे त्वचेवर मसाज केल्याने डॅमेज टिश्यू ठीक होता आणि त्वचा तजेलदार दिसू लागते.

(Image Credit : peachleaf.co)

२) ग्लोइंग त्वचा - त्वचेसाठी मलाई केवळ मॉइश्चरायजर म्हणून काम करत नाही तर त्वचेवर ग्लो येण्यासही याने मदत होते. त्यासाठी मलाईमध्ये थोडं मध मिश्रित करून त्वचेवर लावा. याने त्वचेवर चमक येते. मधात आढळणारे मिनरल्सही त्वचेसाठी फायदेशीर असतात.

३) टॅनिंग दूर करते - मलाईमुळे त्वचेचा रंग उजळतो. मलाईमध्ये आढळणारं लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील टॅनिंग दूर करतं. याने त्वचे नैसर्गिक पद्धतीने उजळते.

(Image Credit : www.indiatimes.com)

४) काळे डाग दूर करा - त्वचेवर पडणारे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही मलाईचा वापर करू शकता. त्वचेवर जिथेही काळे डाग आहेत, त्यावर मलाई लावून काही वेळ ठेवा. चांगल्या प्रभावासाठी मलाईमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करून त्वचेवर लावा. नंतर पाण्याचे चेहरा धुवावा.

५) तरूण राहते त्वचा - दररोज मलाईचा वापर केल्याने त्वचा तरूण, तजेलदार राहते. मलाईमध्ये आढळणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स त्वचेतील कोलेजनची निर्मिती वाढवतात. याने त्वचा तरूण राहते.

Web Title: Know benifits of malai for flawless skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.