खरंच... अॅन्टी-एजिंग क्रिम वापरणं फायदेशीर असतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:02 PM2018-09-30T14:02:38+5:302018-09-30T14:10:46+5:30
बऱ्याच महिलांना आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करताना आपण पाहतो. त्यातल्या त्यात अनेक महिला आपल्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स वापरतात.
(Pic Creadit : Skin Renews)
बऱ्याच महिलांना आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करताना आपण पाहतो. त्यातल्या त्यात अनेक महिला आपल्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेक जणींच्या मनात याबाबत शंका असते की, नक्की अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट कधी वापरावे? अनेकजणींना याबाबत अजिबात माहिती नसते. जाणून घेऊयात याबाबत माहीत करून घेण्याचे काही उपाय...
जर तुम्ही टिनेजर असाल तर तुम्ही सध्या तुमच्या हेल्दी स्कीनची काळजी घेणं गरजेचं असतं. कधी कधी चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचं फार टेन्शन घेऊ नका. या वयामध्ये त्वचा सर्वात हेल्दी असते.
जेव्हा तुम्ही वयाच्या पंचवीशीमध्ये पोहोचता त्यावेळी तुम्हाला तुमच्या स्कीनकेअर रूटीनबाबत सजग असणं गरजेचं असतं. अनेक महिला वयाच्या 20व्या वर्षापासूनच अॅन्टी-एजिंग क्रिम ट्राय करायला सुरुवात करतात. पण असं करणं त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. वयाच्या 25व्या वर्षापासून अॅन्टी-एजिंग क्रिम वापरणं फायदेशीर ठरतं. जसं वय वाढत जातं, तसे शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. त्याचबरोबर त्वचेमध्येही बदल घडून येतात. यापासून अॅन्टी-एजिंग क्रिम त्वचेचं रक्षण करण्याचं काम करतं.
अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांपासून बचाव करण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर असतात, असा दावा करण्यात येतो. सूर्याची किरणं, प्रदुषण वैगरे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात. यावर उपाय म्हणून बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.