चेहऱ्यावरची चरबी हटवण्यासाठी असा करा व्यायाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 05:51 PM2019-12-27T17:51:14+5:302019-12-27T17:57:37+5:30
सुंदर दिसायला सगळ्यांना आवडत असतं. वजन वाढल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यावर दिसत असतो.
सुंदर दिसायला सगळ्यांना आवडत असतं. वजन वाढल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यावर दिसत असतो. गालावरची आणि इतर भागांची चरबी वाढतं असते. तसंच चेहऱ्यावरची चरबी वाढली तर आपण आहोत त्यापेक्षा लठ्ठ दिसू लागतो. त्यामुळे वजन कमी करणं हे मोठं आवाहन होऊन बसतं. तुम्ही सुध्दा या समस्येमुळे त्रस्त असाल तर काही टिप्स तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्की उपयोगी ठरतील.
जर तुम्हाला चेहरा आणि त्याच्या आजूबाजूची चरबी कमी करायची असेल तर कार्डीओ एक्सरसाईज करणं फायदेशीर आहे. त्यात सायकलिंग तसंच धावणे यांचा समावेश असतो. यासोबतच चेहऱ्याचा व्यायामसुध्दा करणं गरजेचं आहे. गालांचा आकार कमी करण्यासाठी काही व्यायाम तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता.
गालांचा व्यायाम
तोंडाने श्वास घ्या आणि काही सेकंदांकरिता तुमचे दोन्ही गाल फुगवा. आता तोंडाने श्वास सोडून द्या आणि हे असे ८-१० वेळा पुनःपुन्हा करा.हा व्यायाम तुमच्या गालाच्या स्नायूंना मजबूत करतो आणि त्यांना बारीक होणे आणि पोकळ दिसणे यापासून प्रतिबंध करतो. जेव्हा तुम्ही एखादा स्नायू एका विशिष्ठ पद्धतीने वापरता तेव्हा त्याने चेहऱ्याचे दिसणे एकदम पालटून जाते. म्हणून कमनीय आणि गूूबगुबीत गालांसाठी हा व्यायाम करा.
डोळ्यांचा व्यायाम
डोळे एवढे मोठे करून पाहा की डोळ्यातील पांढरा भाग जास्तीत जास्त उघडा होईल. नंतर डोळे एकदम घट्ट बंद करा. पुन्हा एकदम मोठे करा. आणि पुन्हा घट्ट बंद करा. डोळ्यातून पाणी येईपर्यंत हे असे वेगाने करीत राहा. आता डोळे बंद करा आणि आराम करा. हा व्यायम ३ ते ४ मिनिटे करा. हा व्यायाम केल्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आणि कपाळाच्या भोवतालच्या स्नायूंना व्यायाम देत आहात.
हनूवटीचा व्यायाम
हनुवटीला दोन्ही हातांमध्ये अशा पद्धतीने धरा की हाताचे दोन्ही अंगठे हनुवटीच्या खाली येतील. केवळ अंगठ्यांच्या सहाय्याने हनुवटीला खालच्या बाजूने दाबत दाबत वरच्या दिशेने या. असे २-३ मिनिटे करा. या व्यायामामुळे मलावरोधापासून सुटका मिळते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच अपचनाच्या त्रासापासून ही सुटका होते. तसंच चेहरा नाजूक दिसण्यास मदत होते.