त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी मड थेरपी, जाणून घ्या इतरही फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 01:17 PM2018-08-28T13:17:47+5:302018-08-28T13:18:41+5:30
मड थेरपी ही एक नॅच्युरोपॅथी आहे. ही थेरपी त्वचेसंबंधी समस्या आणि सौंदर्य समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. या थेरपीने अनेक शारीरिक समस्या दूर होता.
(Image Credit : punenightlife.in)
सध्या वेगवेगळ्या उपचारांसाठी वेगवेगळ्या थेरपींचा उपयोग केला जात असल्याचे बघायला मिळते. त्यात एक चर्चेत असलेली थेरपी म्हणजे मड थेरपी. मड थेरपी ही एक नॅच्युरोपॅथी आहे. ही थेरपी त्वचेसंबंधी समस्या आणि सौंदर्य समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. या थेरपीने अनेक शारीरिक समस्या दूर होता.
मड थेरपीचे फायदे
आयुर्वेदात मातीचा वापर करुन अनेक रोग दूर करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून मातीचा वापर केला जातो. एका शोधानुसार, मड थेरपी शरीराला ताजंतवाणं करण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी महत्तपूर्ण आहे. त्वचेसंबंधी अनेक समस्या या थेरपीच्या माध्यमातून दूर केल्या जाऊ शकतात.
पिंपल्स दूर करण्यासाठी
चांगल्याप्रकारे स्वच्छ करणारी मुलायम माती जसे की मुलतानी मातीची पेस्ट तयार करुन चेहऱ्यावर वापरली जाऊ शकते. याने पिंपल्सची समस्या दूर केली जाऊ शकते. तसेच त्वचेवर एक नैसर्गिक चमकदारपणाही येतो.
पचनक्रिया सुधारते
पोटाच्या खालच्या भागावर मड पॅक लावल्यास पचनक्रिया सुधारते. आतंड्यांमधील गरमपणा कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. त्यासोबतच गॅसची समस्या असेल तेव्हाही पोटावर मड पॅक लावल्यास आराम मिळेल.
डायरिया आणि उलटी
पोट बिघडल्यावर मड पॅक फायदेशीर ठरतो. लूज मोशन झाले असतील आणि पोट दुखत असेल तर पोटावर मड पॅक लावा. याने आराम मिळेल. तसेच उलटी होत असल्यास छातीवर मड पॅक लावल्यास उलट्या होणे बंद होते.
ड्राय स्कीनसाठी
ड्राय स्कीन आणि मांसपेशीमध्ये होत असलेल्या वेदनांमुळे हैराण आहात? तर यावर मड थेरपी फायदेशीर आहे. या थेरपीने त्वचेचं सौंदर्य खुलतं सोबतच ही थेरपी अॅंटी एजिंगचं काम करतं. यासाठी शरीराच्या विविध भागावर माती लावली जाते.
डोळ्यांच्या समस्येसाठी
डोळ्यांवर मड पॅक लावल्यास डोळ्यांच्या मांसपेशींना आराम मिळतो. त्यासोबतच याने दृष्टी चांगली होण्यासही मदत मिळते.
डोकेदुखी आणि तणाव
मड थेरपी डोकेदुखी दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. माती कपाळावर लावण्याचा सल्ला दिला जातो. याने डोक्यातील उष्णता दूर होते आणि डोकेदुखी व तणावही दूर होतो.