डोक्याला खाज येत असेल तर झेंडूच्या फुलांचा असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 04:57 PM2019-12-17T16:57:35+5:302019-12-17T17:03:39+5:30
झेंडूची फुलं ही कोणताही ऋतु असेल तरी सहज उपलब्ध होत असतात.
झेंडूची फुलं ही कोणताही ऋतू असेल तरी सहज उपलब्ध होत असतात. जर तुमच्या डोक्याला खाज येत असेल तर झेंडूची फुलं नक्कीच फायदेशीर ठरतील. कारण सध्याच्या काळात वातावरणात होत असलेले बदल, प्रदुषण यांमुळे केसांशी निगडीत अनेक समस्या जाणवतात. केस गळणं, केसांना खाज येणं तसंच कोंडा होणं अशा अनेक समस्यांचा सामना आपल्याला रोजच्या जीवनात करावा लागतो.चला तर मग जाणून घेऊया झेंडूच्या फुलांचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
केस व्यवस्थित राहण्यासाठी केसांची त्वचा सुध्दा चांगली राहणं महत्त्वाचं असतं. अनेकदा स्काल्पवर खाज खूप येते. हिवाळ्यात ही समस्या वाढीस लागते. केसांच्या मुळाशी असलेला कोरडेपणा यामुळे खाजेची समस्या अधिक असते. जर केसांच्या मुळांशी असलेला रुक्षपणा हटवला नाही तर खाजही येतेच त्यासोबतच कोंड्याची समस्याही सतावते. जर कोंड्यावर योग्य उपचार केले नाहीत तर मायक्रोबायल इन्फेक्शन होऊ शकते.
झेडूंची फुलं ही केसांच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्ही केसांना तेल लावण्यासोबतच झेडुच्या फुलांचे तेल लावले तर स्काल्पसाठी फायदेशीर ठरते. झेंडूच्या फुलांचा वापर केसांवर करण्यासाठी सगळ्यात आधी ५०० मिली पाणी घ्या. त्यात ५ झेंडूची फुलं टाका. मग पाणी ५ मिनिटं उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या दिवशी ह्या पाण्याने डोक्याची मसाज करा. त्यानंतर शॅम्पू लावून केस धुवून टाका. हा प्रयोग केल्यास केसांवर तसंच स्काल्पवर झालेले इन्फेक्शन दूर होईल. त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलाचा अर्क असलेले पाणी प्यायल्याने पोटाचे इन्फेकशन दूर होण्यास मदत होते.