पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:14 PM2018-10-02T12:14:23+5:302018-10-02T12:16:19+5:30

पिंपल्स येणं आणि त्यापासून अॅक्ने तयार होणं हा एक नॉर्मल स्कीन प्रॉब्लेम आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषही या समस्येने त्रस्त असतात. साधारणतः ही समस्या 12 ते 25 या वयादरम्यान होते.

know how to way eat should be to avoid the problem of acne and clear skin | पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!

पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!

Next

पिंपल्स येणं आणि त्यापासून अॅक्ने तयार होणं हा एक नॉर्मल स्कीन प्रॉब्लेम आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषही या समस्येने त्रस्त असतात. साधारणतः ही समस्या 12 ते 25 या वयादरम्यान होते. परंतु, काही बाबतीत पिंपल्सची समस्या त्यानंतरही होते कारण त्याची अनेक कारणं असतात. जी स्कीनवर अॅक्ने होण्यास कारणीभूत ठरतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय ट्राय करण्यात येतात. परंतु पिंपल्स होण्याचं खरं कारण समजत नाही तोपर्यंत यापासून सुटका करणं फार कठीण असतं. जास्त तणाव, हार्मोन्समध्ये बदल आणि अनेक प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणं ही देखील अॅक्ने होण्याची कारणं असू शकतात. परंतु यामध्ये सर्वात मोठं कारण तुमचं डाएट ठरू शकतं. 

स्कीन हेल्दी ठेवण्यासाठी बॅलेन्स डाएट घेणं गरजेचं असतं. तुमच्या खाण्याची सवय पिंपल्स होण्याचं थेट कारण ठरत नाहीत परंतु, तेलकट पदार्थ खाल्याने किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खाल्याने तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्याने स्कीन तेलकट होते. अस्वच्छ हात सतत चेहऱ्याला लावल्यानेही स्कीनवर पिंपल्स येतात. 

अॅक्नेपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करा -

ओमेगा 3 फॅट अॅसिड 

ओमेगा 3 फॅट अॅसिड अधिक प्रोटीन असणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये आढळून येतं. पिंपल्सपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्या डाएटमध्ये मासे, अक्रोड, जवस यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे स्कीनवरील अॅक्ने दूर होण्यासाठी मदत होईल. 

व्हिटॅमिन ए, डी आणि ई 

हेल्दी स्कीनसाठी व्हिटॅमिन्स अत्यंत आवश्यक असतात. व्हिटॅमिन ए महिला आणि पुरूष दोघांच्याही स्कीनसाठी फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन ए, डी आणि ई साठी आहारामध्ये गाजर, अंडी, कच्च दूध, मशरूम, पालक, ऑलिव्ह ऑइल आणि टॉमेटोचा समावेश करा. 

मोठ्या प्रमाणात पाणी प्या 

स्कीन निरोगी ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल आणि शरीरामध्ये ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होण्यास मदत होईल. पाण्याशिवाय तुम्ही अशी फळं आणि भाज्यांचाही आहारात समावेश करा ज्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असेल. त्याचप्रमाणे दिसभरात जवळपास 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

ड्राय फ्रुट्स 

बदाम, अक्रोड यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीलियम असतं. जे त्वचेच्या पेशींना सूज येण्यापासून वाचवते. त्याचसोबत त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. 

Web Title: know how to way eat should be to avoid the problem of acne and clear skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.