स्काल्पवर पिंपल्स येतात? असू शकतो स्काल्प एक्ने, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:46 PM2020-01-20T13:46:22+5:302020-01-20T13:48:13+5:30
केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात.
केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात. कधी कोंडा होणे, कधी केस गळणे तर कधी केसांमध्ये पुटकुळया उद्भवण्याचा धोका असतो. यातील सगळ्यात त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे केसांच्या मुळामध्ये म्हणजेच स्काल्पवर एक्नेची समस्या उद्भवते.
साधारणपणे डोक्यात खाज कोंड्यामुळे येते. लहान लहान दाण्यांसारख्या पुळ्या केसांवर येत असतात. अनेकदा याचे रुपांतर गंभीर आजारांमध्ये सुद्धा होऊ शकते. केसांच्या मुळांना सूज येण्याची समस्या प्रदुषण आणि फंगल इन्फेक्शनमुळे उद्भवत असते. त्याला स्काल्प डर्माटाइटिस असं म्हणतात. याला पर्यायी शब्द म्हणून स्काल्प एक्ने असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊया स्काल्प एक्नेचे कारणं आणि उपाय.
स्काल्प एक्ने झाल्यानंतर डोक्यात पिंपल्स येतात. ज्यात केसांच्या मागच्या भागाचा सुद्धा समावेश असतो. या पिंपल्समुले खाज यायला सुरूवात होते. हेयर फॉलिकल डेड स्किन सेल्सना चिकटून हे फॉलिकल्स असतात.
स्काल्प एक्नेची कारणं
हेअरजेल हेअर क्रिम आणि हेअरस्पा यांच्या वापरामुळे एलर्जी होणे.
केसांना चांगले न धुणे.
व्यायाम केल्यानंतर खूपवेळ घाम तसाच ठेवणे.
केसं सतत झाकून ठेवल्यामुले ओसलरपणा येणे.
जीवनशैलीत झालेला बदल.
स्काल्प एक्ने पासून बचाव करण्यासाठी उपाय
केसांवर खपली यणे, कोंडा होणे तसंच पिंपल्स येणे या समस्यांपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
केस ताणले जातील अशी हेअरस्टाईल करू नका.
केसांना मोकळे आणि लूज वाटेल अश्या पध्दतीने बांधा.
व्यायाम केल्यानंतर लगेच केस धुणं टाळा.
केमिकल्सयुक्त ब्युटी प्रोडक्टसचा वापर करू नका.
केसांची त्वचा चांगली ठेवण्यासाठी व्हिटामीन ई आणि व्हिाटामीन ए असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
संतुलित आहार घ्या त्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहील.