वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:25 IST2020-01-12T14:25:18+5:302020-01-12T14:25:43+5:30
तुम्ही तरूण असाल किंवा मध्यम वयाचे किंवा म्हातारपणाकडे जाणारं तुमचं वय असेल काही जरी असले तुमच्या वयापेक्षा तुमचा चेहरा आणि त्वचा कशी दिसते हे महत्वाचं असतं.

वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल
तुम्ही तरूण असाल किंवा मध्यम वयाचे किंवा म्हातारपणाकडे जाणारं तुमचं वय असेल काही जरी असले तुमच्या वयापेक्षा तुमचा चेहरा आणि त्वचा कशी दिसते हे महत्वाचं असतं. प्रत्येकालाच सुंदर दिसावसं वाटत असतं. काहीजण सुरूवातीपासूनच सुंदर दिसत असतात पण काही जणांना त्वचेच्या समस्या असतात. या समस्या सोडवण्यासाठी अनेकदा स्त्रिया वेगवेगळी ब्युटी प्रोडक्स वापरताना आपण पाहीले आहे. पण सध्याच्या काळात अनेक महिला फ्रिक्शन थेरेपीचा वापर करून आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे फ्रिक्शनल थेरेपी.
(image credit-nikita.grid.id)
तरूण वयोगटात ही थेरेपी सर्वाधिक केली जात आहे. ज्यांच्या त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव पडत असतो. त्या लोकांना हेल्दी स्कीन हवी असते. असे लोकं ही थेरेपी करतात. या थेरेपीमध्ये युव्ही किरणांच्या सहाय्याने त्वचेवरील मृतपेशी काढून टाकल्या जातात. यात मुरुम डोळ्यांच्या आजूबाजूची काळी वर्तुळ तसंच इन्फेक्शन नाहिसे करता येतात.
या थेरेपीमध्ये रोलचा वापर केला जातो. ज्यात मायक्रो निडल्स असतात. या निडल्स त्वचेत एका प्रकारचं सिरम पोहोचवतं असतात. यामुळे स्किन टाईट होते. त्याचबरोबर पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि स्कॉर्स नाहीसे होतात. थेरेपीची प्रकिया २ तासांची आहे.
(image credit- gruopon.com)
तसंच यात ४ स्टेप्स असतात. तज्ञांच्या मते या थेरेपीमुळे बल्ड सर्क्युलेशन नॉर्मल करून त्वचेवरील मृतपेशी हटवल्या जातात. त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी ही थेरेपी उत्तम असते. ही थेरेपी केल्यानंतर त्वचा नॉर्मल होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात.