त्वचेच्या समस्या असतील अनेक, पण उपाय एक टी ट्री ऑइल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 11:51 AM2018-11-30T11:51:08+5:302018-11-30T11:52:09+5:30
ब्यूटी प्रॉडक्टचा विषय निघाल्यावर टी ट्री ऑइल हा शब्द अनेकांनी अनेकदा असेलच. पण अनेकांना हे काय आहे आणि कशापासून तयार होतं हे माहीतच नसतं.
ब्यूटी प्रॉडक्टचा विषय निघाल्यावर टी ट्री ऑइल हा शब्द अनेकांनी अनेकदा असेलच. पण अनेकांना हे काय आहे आणि कशापासून तयार होतं हे माहीतच नसतं. पण आता आम्ही या तेलाबाबतच्या खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टी ट्री ऑइल हे ऑस्ट्रेलियातील वनस्पती मेललेका अल्टरिफोलियापासून तयार केलं जातं. मुळात या तेलाचं नाव ऐकून अनेकांना असं वाटतं की, हे तेल चहाच्या झाडांपासून तयार केलं जात असावं, पण असं काही नाहीये.
टी ट्री ऑइलचे फायदे
टी ट्री ऑइलला वायरस, बॅक्टेरिया आणि फंगसपासून होणाऱ्या संक्रमण आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी खास मानलं जातं. या तेलाच्या खास गुणांमुळेच हे तेल सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि आरोग्यासंबंधी उत्पादनांमध्ये लोकप्रिय झालं आहे. याचा दररोज वापर केल्याने त्वचा तर निगोरी राहतेच सोबतच तुमच्या केसांना फायदा होतो आणि आरोग्यही चांगली राहतं.
त्वचेसाठी फायदेशीर टी ट्री ऑइल
पिंपल्सवर उपाय - टी ट्री ऑइल हे वेगवेगळ्या प्रकारच्या पिंपल्सवर उपाय म्हणून सर्वात चांगला पर्याय मानलं जातं. या तेलाने त्वचेवर लगेच येणारे पिंपल्स दूर करण्यास मदत मिळते. तसेच याने पुन्हा येणेही थांबवले जाऊ शकते.
कसा कराल वापर
अर्धा कप पाणी घ्या आणि त्यात टी ट्री ऑइलचे ३ ते ४ थेंब टाका. हे मिश्रण कापसाच्या मदतीने पिंपल्सवर लावा आणि २० ते २५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. हे कोरडं झाल्यानंतर मॉइश्चरायजर लावा आणि चेहरा धुवा.
मध आणि दह्यासोबत - टी ट्री ऑइलचे २ ते ३ थेंब, एक मोठा चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र करा. हे मिश्रण पिंपल्सवर २० मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा धुवा.
खोबऱ्याच्या आणि बदाम तेलासोबत - टी ट्री ऑइलचे २ ते ३ थेंब, त्यात एक चमचा खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
त्वचेला करतं मॉइश्चराइज
टी ट्री ऑइल शुष्क आणि आकुंचण पावलेली त्वचा ठिक करण्यास मदत करतं. त्वचा मुलायम करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. त्वचेवर पडलेले काळे डाग दूर करण्यासाठीही याने मदत होते. याने त्वचा उजळते.
ग्लिसरीनसोबत - टी ट्री ऑइलमध्ये थोडं ग्लिसरीन मिश्रित केल्यास याने कोरडी त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
खोबऱ्याच्या/बदामच्या तेलासोबत - टी ट्री ऑइलचे १ ते २ थेंब, एक चमचा खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेल मिश्रित करा. हे मिश्रण केलेलं तेल कोरड्या त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
काळे डाग दूर करा
टी ट्री ऑइलमुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी मोठी मदत होते. रोज मधाचे काही थेंब या तेलात टाकून त्वचेवर लावा. १० मिनिटे हे तसंच राहू द्या आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
त्वचेवर नैसर्गिक चमक
टी ट्री ऑइल चांगल्या आरोग्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. यासाठी टी ट्री ऑइलमध्ये एक टोमॅटो बारीक करुन टाका. यात जोजोबा तेलही मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
ब्लॅकहेड्स दूर करा
टी ट्री ऑइलमध्ये अँटीमिक्राबियल गुण केवळ पिंपल्स दूर करण्यास मदत करत नाही तर याने चेहऱ्यावरील काळे डागही दूर होतात. मुल्तानी मातीमध्ये या तेलाचे काही थेंब आणि थोडं पाणी टाका. याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा.