लग्नाच्या दोन दिवसांआधी 'या' ब्यूटी ट्रिटमेंट करणे पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:28 AM2018-11-27T11:28:57+5:302018-11-27T11:42:36+5:30

सध्या सगळीकडे लग्नाची धावपळ बघायला मिळत असून लग्न जुळलेल्या तरुणींना लग्नाच्या मेकअपचं टेन्शन येऊ लागलंय.

Know which beauty treatment should avoid the bride two days before marriage | लग्नाच्या दोन दिवसांआधी 'या' ब्यूटी ट्रिटमेंट करणे पडू शकतं महागात!

लग्नाच्या दोन दिवसांआधी 'या' ब्यूटी ट्रिटमेंट करणे पडू शकतं महागात!

Next

सध्या सगळीकडे लग्नाची धावपळ बघायला मिळत असून लग्न जुळलेल्या तरुणींना लग्नाच्या मेकअपचं टेन्शन येऊ लागलंय. लग्नाच्या दिवशी आपला लूक चांगला असावा किंवा जास्त आपण जास्त सुंदर दिसावं म्हणून त्यांची तयारी फार  आधीपासून सुरु झालेली असते. वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंटमुळे अर्थातच चेहऱ्यावर उजाळा येतो आणि लग्नाच्या दिवशी चेहरा अधिक तजेलदार दिसतो. पण लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर कोणतीही समस्या होऊ नये, यासाठी लग्नाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. चला जाणून घेऊ नवरीने लग्नाच्या एक-दोन दिवसआधी कोणत्या ट्रिटमेंट करु नये. 

(Image Crdit :www.divaspaqatar.com)

वॅक्सिंग - लग्नाच्या एक दिवसाआधी वॅक्सिंग करणे टाळले पाहिजे. प्रत्येक महिलेला वाटत असतं की, तिची त्वचा मुलायम दिसावी. त्याप्रमाणे नवरीलाही वाटत असतं की, तिची त्वचा मुलायम दिसावी. पण लग्नाच्या एक कमीत कमी  एक आठवडाआधी त्यांनी वॅक्सिंग केलं पाहिजे. कारण वॅक्सिंगमुळे अनेक महिलांना रॅशेज किंवा पॅच होतात. याने तुमचं सौंदर्य कमी होऊ शकतं.

थ्रेडिंग - थ्रेडिंग सुद्धा वॅक्सिंगप्रमाणेच असतं. हे सुद्धा लग्नाच्या दिवशी किंवा एक दिवसआधी करु नये. कारण अनेकदा थ्रेडिंग करताना तुम्हाला कट लागू शकतो. हा कट दूर होण्यासाठी वेळ लागतो. जर लग्नाच्या एक दिवसआधी तुम्ही थ्रेडिंग केलं आणि कट लागला तर तुमची सुंदरता कमी पडू शकते. 

फेशिअल - त्वचेवरील मळ दूर करण्यासाठी फेशिअल करणे गरजेचं असतं. पण हे सुद्धा लग्नाच्या ३ ते ४ दिवसांआधी करावं. लग्नाच्या दिवशी करु नये कारण यात केमिकल क्रिमचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेवर जळजळ, अॅलर्जीची शक्यता असते. 

(Image Credit : www.beautygrace.com.au)

पील - त्वचेवर निखार आणण्यासोबतच पिंपल्स दूर करण्यासाठी पील फायदेशीर ठरतं. पण लग्नाच्या एक दिवसआधी याचा वापर करणे फायदेशीर ठरत नाही. पीलिंगने त्वचा शुष्क आणि संवेदनशीलही होऊ शकते. 

(Image Credit : www.vixendaily.com)

माइश्चरायजर लावणे विसरु नका - त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचा सतत पाण्याने धुणे फायद्याचे ठरते. पण साबणाने त्वचा धुतल्याने त्वचा रखरखीत होते. चेहऱ्याचा नाजूकपणा दूर होतो. अशात मॉइश्चरायजरचा वापर महत्त्वाचा ठरतो. 

Web Title: Know which beauty treatment should avoid the bride two days before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.