घरी मेटल ब्लॅकहेड रिमुव्हलचा वापर करणे योग्य कि अयोग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:45 PM2019-01-04T12:45:15+5:302019-01-04T12:47:53+5:30

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते आणि त्यामुळे महिला नेहमीच ब्लॅकहेड्स घरीच दूर करत असतात. नाकाच्या शेंड्यावर आणि गालांवर ब्लॅकहेड्स सर्वात जास्त आढळतात.

Know why you should not use blackheads extractor at home | घरी मेटल ब्लॅकहेड रिमुव्हलचा वापर करणे योग्य कि अयोग्य?

घरी मेटल ब्लॅकहेड रिमुव्हलचा वापर करणे योग्य कि अयोग्य?

Next

(Image Credit : onetwocosmetics.com)

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते आणि त्यामुळे महिला नेहमीच ब्लॅकहेड्स घरीच दूर करत असतात. नाकाच्या शेंड्यावर आणि गालांवर ब्लॅकहेड्स सर्वात जास्त आढळतात. जेव्हा धूळ आणि तेल त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करतात तेव्हा तुम्ही चेहरा चांगल्याप्रकारे स्वच्छ करु शकत नाहीत. अशावेळी चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येतात. अनेक दिवस हे ब्लॅकहेड्स दूर न केल्याने याचे डाग चेहऱ्यावर पडतात आणि सहजपणे दूरही होत नाही.

तसे तर ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपायही आहेत. पण सामान्यपणे महिला मेटल ब्लॅकहेड्स रिमुव्हलचा वापर करतात. याला पिंपल एक्सट्रॅक्टर किंवा ब्लॅकहेड एक्सट्रॅक्टर असंही म्हटलं जातं. याच्या टोकावर एक छिद्र असतं आणि दुसऱ्या टोकाला धार असते. याने ब्लॅकहेड्सवर दाबल्यास त्यातील द्रव्य बाहेर येतं आणि पिंपल पूर्णपणे स्वच्छ होतात. योग्य पद्धतीने याचा वापर केला तर ब्लॅकहेड्स सहजपणे पिंपल दूर केले जाऊ शकतात. पण यात जर काही चूक झाली तर याने त्वचेचा तो भाग खरचटलाही जाऊ शकतो. त्या जागेवरचं मासही निघू शकतं. याची जखम झाली तर समस्या अधिक वाढू शकते. 

याबाबत तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला मेटल एक्सट्रॅक्टरचा वापर करणे येत नसेल तर एखाद्या तज्ज्ञांची मदत घ्या. जर याचा वापर करताना तुम्ही दबाव जास्त दिला तर त्वचेच्या आतील भागास इजा होऊ शकते. याने त्वचेवर डाग पडण्याची शक्यता अधिक असते. त्यासोबतच याचा वापर केल्यावर तुम्ही त्याची चांगली स्वच्छता केली नाही तर पुन्हा वापर करताना त्यातील बॅक्टेरिया त्वचेच्या आत जाऊ शकतात. 

त्यामुळे जेव्हाही याचा वापर तुम्ही कराल तेव्हा मेटल एक्सट्रॅक्टरला पाण्यात उलडा. त्यानंतरच त्याचा वापर करा. हे खरेदी करताना जास्त धारदार असू नये हे तपासून घ्या. प्रयत्न करा की, याचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपायांनीच ब्लॅकहेड्स दूर करण्याचे उपाय शोधा. असे केल्यास कोणतेही साइड इफेक्ट होण्याचा धोका नसतो. 

Web Title: Know why you should not use blackheads extractor at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.