२१ वर्षीय काइली जेनरने श्रीमंतीच्या बाबतीत फेसबुकच्या मालकाला दिली मात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:28 PM2019-03-06T17:28:14+5:302019-03-06T17:31:23+5:30
नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा फोर्ब्सने बिलियनिअर्सची यादी जाहीर केली आहे. ज्यात जगभरातील श्रीमंतांची नावे आहेत.
नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा फोर्ब्सने बिलियनिअर्सची यादी जाहीर केली आहे. ज्यात जगभरातील श्रीमंतांची नावे आहेत. या यादीत सर्वात आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे काइली जेनर, काइलीने फेसबुक मालक मार्क झुकरबर्गला मागे टाकत जगातली सर्वात श्रीमंत तरूण अब्जाधिश झाली आहे.
२१ वर्षीय काइली ही अमेरिकन टीव्ही स्टार असण्यासोबतच किम, कोल आणि कर्टनी कार्दिशिया यांची सावत्र बहीण आहे, काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे.
मेकअप इंडस्ट्रीची क्वीन काइली जेनर 'काइली कॉस्मेटिक्स' नावाच्या कंपपनीची ओनर आहे. तिने तीन वर्षांआधी म्हणजे २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. सध्या या कंपनीची व्हॅल्यू ९० कोटी डॉलर(६४ अरब रूपये) इतकी असल्याचं सांगितली जाते. काइलीचे ब्यूटी प्रॉडक्ट वापरणाऱ्यांमध्ये श्रींमत लोकांचा भरना जास्त आहे.
काइली कॉस्मेटिक्सचे १ हजार पेक्षा जास्त स्टोर्स आहेत. या कंपनीने गेल्यावर्षी ३६० मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली होती. याआधी काइली जगातल्या सर्वात कमी वयाच्या श्रीमंत महिलांच्या यादीत जागा मिळाली होती. त्यावेळी तिला फोर्ब्स मॅगझिनच्या कव्हर पेजवरही जागा मिळाली होती.
काइलीने २०१७ मध्ये ट्रेविस स्कॉट याच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. काइली इन्स्टाग्रामवरही चांगलीच लोकप्रिय आहे. तिला इन्स्टाग्रामवर १२ कोटींपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा २३ व्या वर्षी सर्वात कमी वयाचा अब्जाधिश झाला होता. पण आता २०१९ मध्ये हा किताब काइली जेनरच्या नावे झाला आहे.
फोर्ब्स यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बीजोस आता जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. फोर्ब्सनुसार, जेफ १३१ अरब डॉलरचे मालक आहेत आणि २०१८ च्या तुलनेत त्यांची कमाईत यावेळी १.९ अरब डॉलरने वाढ झाली आहे. फोर्ब्सने मंगळवारी २, १५३ लोकांची यादी जाहीर केली. श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी हे १३ व्या स्थानावर आहेत.