लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:32 PM2019-01-22T17:32:28+5:302019-01-22T17:33:26+5:30
दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात.
दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. याशिवाय अनेक पार्लर ट्रिटमेंटचा आधार घेतात. सध्या या ट्रिटमेंटमध्ये लेझर फेशियल ट्रेन्डमध्ये आहे. एकदा केल्यानंतर याचा परिणाम चेहऱ्यावर 4 ते 6 आठवड्यांपर्यत राहतो. अनेक सामान्य महिलांपासून सेलिब्रिटीही ही ट्रिटमेंट सर्रास करताना दिसत आहेत. एवढचं नव्हे तर अनेक पुरूषही लेझर फेशिअल ट्रिटमेंट करून घेत आहेत.
- तसं पाहायला गेलं तर हे फेशिअल कोणीही करू शकतं. परंतु ज्या लोकांचा स्किन टोन डार्क असतो त्यांनी हे फेशिअल करू नये. कारण डार्क त्वचेवर लेझर फेशिअलचा वापर केल्याने स्किन बर्न होण्याचा धोका संभवतो. ज्या लोकांना सूर्याच्या किरणांपासून अॅलर्जी आहे, चेहऱ्यावर एखादं जखमेचं निशाण आहे किंवा त्वचेवर संक्रमण किंवा सूज आहे. कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असणाऱ्यांनी हे फेशिअल अजिबात करू नये.
- हे फेशिअल फक्त 15 मिनिटांसाठी असतं. हे डर्मेटोलॉजिस्ट किंवा प्लॅस्टिक सर्जन यांच्याकडूनचं करून घेणं आवश्यक असतं. हे फेशिअल केल्यानंतर चेहऱ्यावर लालसर चट्टे किंवा सूज येते. ज्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसते. काही वेळाने हे लालसर चट्टे नाहीसे होतात.
- हे फेशिअल केल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील होते. यामुळे त्वचेच्या आरोग्यानुसार, फेशिअल केल्यानंतर या व्यक्तीला काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी घरामध्ये राहणं आवश्यक असतं. यामागील कारण म्हणजे, सूर्याच्या अल्ट्रावॉयलेट किरणांपासून बचाव केला जाऊ शकतो. या फेशिअलनंतर त्वचा थोडी कोरडी होती. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मॉयश्चरायझरचा वापर करू शकता.
- चेहरा मीठाच्या पाण्याने धुतल्यानंतर त्यावर बर्फाचे तुकडे ठेवले जातात. ज्यामुळे चेहऱ्यावरील स्किन पोर्स ओपन होतात. चेहऱ्याच्या त्वचेचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी त्यावर जेल लावण्यात येतं. त्यानंतर चेहऱ्यावर कमी वेळासाठी लेझर शॉर्ट्स देण्यात येतात. यामुळे वेदना होत नसून त्वचेवर थोडीशी उष्णता जाणवते.