हसणे हे आरोग्यवर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2016 02:18 PM2016-07-15T14:18:21+5:302016-07-15T19:48:21+5:30

नियमीत हसणे हे स्वभाव व आरोग्यासाठीही उत्तम आहे.

Laughing is a healthy addition | हसणे हे आरोग्यवर्धक

हसणे हे आरोग्यवर्धक

googlenewsNext

/>चेहऱ्यावर नेहमी हास्य असणाऱ्या व्यक्तिला काहीजण  माघारी नावेही ठेवतात.  परंतु, हसण्याचे विविध फायदे आहेत. त्यामुळे  आजरांनाही दूर ठेवता येऊन, शरीर स्वास्थासाठी हसणे हे आरोग्यवर्धक आहे.  अलीकडे तणावाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा तणाव घालविण्यासाठीही हसणे हा एक परिपक्क उपाय आहे.

 हसणारी व्यक्ति ही मनमोकळे बोलणारी असते.  तसेच समारेच्या व्यक्तिचा ताणही कमी होतो. त्याकरिता सर्वचदृष्ट्या हसणे हे खूप फायद्याचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी नकारात्मकाऐवजी सकारात्मक विचार मनात येतात. स्वत: बरोबरच इतरांनाही आनंदी ठेवता येते. विविध प्रकारचे कॉमेडी शो किंवा कॉमेडी चित्रपट पाहणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप फायदेशीर आहेत. अशा कार्यक्रमातून मनमुरादपणे हसता येते. त्यामुळे अलीकडे विविध वाहिन्यावर कॉमेडी शो चे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात.

हसण्यामुळे होणारे विविध  फायदे

मेंदूचा व्यायाम
हसण्यामुळे शरीराला एकप्रकारे ऊर्जा मिळते. त्यामुळे आयुष्य वाढते. शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दुख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतो

चेहऱ्यावर नेहमी उत्साह
चेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहºयावरील टवटवीतपणा कायम राहतो.

 प्रतिकार क्षमता वाढते
हसण्याने शरीराची प्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. तसेच आजारही दूर ठेवता येतात.

संतुलन राखण्यासाठी
संतुलन राखण्यासाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. त्याकरिता एकटे राहण्यापेक्षा सदैव मित्रांसोबत वेळ घालविणे आवश्यक आहे. त्यामुळेही आपल्याला संतुलन राखता येते.

 हृदयासाठी उत्तम
ज्यांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते. तितक्या ह्दयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.


गुणवत्ता वाढते
आपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. कारण की, हसण्यामुळे काम किंवा वाचनावर लक्ष केद्रिंत होते. त्यामुळे आपली गुणत्ता सिद्ध होते.

 नातेसंबंधासाठी उपयुक्त
हसणाºया व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी हसणे हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख व उत्साह असणाºया व्यक्तिकडे लोक आकर्षिंत होत असतात.


हार्मोन्सची सक्रियता वाढते
 हसण्यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. त्यामुळे कितीही तणाव असला तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

 वजनासाठी उपयुक्त
हसत राहिल्याने चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वाढणारे वजनही नियंत्रीत ठेवता येते. जास्त खाणे व तणाव या गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.

त्रास कमी होतो
हसल्याने शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील होतो. त्यामुळे शरीराचा भागात होत असलेला  हसण्यामुळे कमी होतो. पेन किलरप्रमाणे हा रासयनिक घटक काम करतो.

बॉलिवूडचे विनोदी कलाकार
बॉलिवूडमध्ये विनोदी अभिनेता म्हणून आजही जॉनी लिव्हर व रझाक खानला ओळखले जाते. जॉनी लिव्हरने प्रेक्षकांना नेहमी आपल्या विनोदी भूमिकेमुळे हसवत ठेवले.



गोविंदा, संजय दत्त, अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत जॉनी लिव्हरने विनोदी चित्रपट केले आहेत. तसेच बॉलिवूडमधील दुसरा विनोदी कलाकार रझाक खानने क्या कूल है हम, गोलमाल, राजा हिंदुस्तानी, हेराफेरी, हॅलो ब्रदर आदी चित्रपटात विनोदी भूमिका केलेल्या आहेत.



विशेष म्हणजे रझाक खानच्या या सर्व भूमिका खूप गाजलेल्या आहेत. यासह बॉलिवूडधील अन्य काही स्टारनी सुद्धा काही प्रमाणात विनोदी भूमिका केलेल्या आहेत.




 

Web Title: Laughing is a healthy addition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.