छंदा शिवाय जीवन अधूरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2016 03:02 PM2016-07-10T15:02:29+5:302016-07-10T20:47:01+5:30

मानवाला जीवनामध्ये छंद असणे हे खूप गरजेचे आहे.

Life incomplete without a hood | छंदा शिवाय जीवन अधूरे

छंदा शिवाय जीवन अधूरे

Next

/> छंदामुळे कोणत्याही कामाचा तणाव घालविता येतो. त्यामुळे चित्रकला, वाचन, संगीत, नृत्य, नाट्य, लेखन आदी कुठलातरी  छंद हा प्रत्येकांनी जोपासलाच  पाहीजे. छंदाशिवाय  जीवन हे समृद्ध होऊच शकत नाही. मनाची सक्षमता तसेच  उत्साह  वाढविण्यासाठ छंद हा फार आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या दररोजच्या कामातून वेळ काढून छंदाची जोपासना करावी. छंद हा व्यावहारीक, सामाजिक व भावनीक ओलावा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतो. जीनाचाही अर्थ छंदाशिवाय कळून येत नाही. उद्योगपती, राजकारणी, बॉलीवूड स्टार सुद्धा छंदाची जोपासना हमखास करतात. तसेच छंदावर आधारित अनेक चित्रपटही आहेत. 

छंदाचे फायदे 
दैनंदिन तणावापासून सुटका. सकारात्मकता वाढते. आत्मविश्वास वाढून न्यूनंगड घालविता येतो. मनाला आत्मशांती मिळते व मनोरंजनही होते. स्वत: सह दुसºयालाही प्रेरणा मिळते. नवनवीन कल्पना सुचतात. मेंदू तल्लक राहून, एकाग्रता वाढते. आपल्या नोकरी व व्यवसायातही छंदाचा फायदा होतो. कितीही काम केले तर तणावापासून दूर राहता येते. त्यामुळे आॅफिस व कुटुंबातही नेहमी सकारात्मक वातावरण टिकवून ठेवता येते. तसेच स्वत: ला नेहमी गुंतून राहता येते . रिकाम्या वेळेत छंद जोपासल्याने व्यसन लागण्याची शक्यता कमी असते. सर्वकाही असूनही अनेक राजे महाराजे सुद्धा आपला छंद जोपासण्याचे काम करीत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. छंदातून विविध प्रकारचे वस्तूची आपण निर्मिती करुन, मोठा रोजगारही मिळू शकतो. व त्यामधून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करता येते. 

छंदाचे तोटे 
मानवाला जीवनात छंद नसेल तर तो नेहमी तणावाखाली आपले जीवन जगत असतो. निराशा, थकवा हे कायम त्याच्यामध्ये असते. मन हे कधीही शांत राहत नाही व  त्याचबरोबर न्यूनंगडाची भावना वाढीस लागते. छंदाची जोपासना होेत नसल्यानेच अलीकडे निराशापोटी  आत्महत्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अलीकडे मोबाईल व इंटरनेटचाच छंद अनेकांना लागले आहेत. त्यामुळे मूळ छंदापासून ते दूर गेले आहेत. 

सेलिब्रिटीचे छंद
जीवनामध्ये छंद हे प्रत्येकालाच असतात. परंतु, त्याची जोपासना करणेही आवश्यक आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी काय छंद जोपासतात त्याची ही माहिती. सलमान खानला महागड्या साबण,
विद्या बालनला साडी जमविण्याचा,



प्रियंका चोप्राला वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर्स जमविणे आवडते.



तिच्याकडे प्रत्येक ब्रॅण्डचे फुटवेअर्स कलेक्शन आहे. कंगणा राणावतला टॅटूची आवड असून, तिने आपल्या मानेवर व पायावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. जॉनला बाईकचा खूप वेड असून, त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाईक आहेत. बिपाशा बासूला घड्याळीची आवड असून, तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या घड्याळी आहेत. अजय देवगनला कारची आवडत असून, त्याच्याकडे विविध प्रकारचे कार आहेत. तर अमिषा पटेल ही बॅगची फॅन असून, तिला  वेगवेगळ्या बॅगचे कलेक्शन आहे.  शाहरुख खानला जीन्स पॅन्टचे वेड असून, त्यामुळे तो नेहमी तो जीन्सवर अधिक दिसतो. 

छंदावर आधारीत ‘एबीसीडी -२ ’



वरुण धवन, श्रद्धा कपूर असलेला ‘एबीसीडी -२’ हा चित्रपटही छंदावर  आधारित असून, यामध्ये डान्सचा छंद दाखविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एबीसीडी हा सिनेमाही डान्स छंदावरच आहे. तसेच बॉलीवूडच्या अनेक चित्रपटामध्ये अभिनेता व अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे  छंद जोपासत असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. यावरुनच जीवनामध्ये छंद हे किती महत्त्वाचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  
-----------------------------------------------------------

Web Title: Life incomplete without a hood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.