हेअर स्मूदनिंग की स्ट्रेटनिंग; केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:39 PM2019-05-13T13:39:07+5:302019-05-13T13:39:41+5:30

हेक्टिक लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोकांकडे केसांची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो. अशातच सिल्की आणि शायनी केसांसाठी लोक पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट फॉलो करत असतात.

Lifestyle hair care tips smoothening or hair straightening what is better | हेअर स्मूदनिंग की स्ट्रेटनिंग; केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

हेअर स्मूदनिंग की स्ट्रेटनिंग; केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

googlenewsNext

हेक्टिक लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोकांकडे केसांची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो. अशातच सिल्की आणि शायनी केसांसाठी लोक पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट फॉलो करत असतात. ड्राय आणि फ्रिजी केस ठिक करण्यासाठी जास्तीत जास्त लोक स्ट्रेटनिंगचा ऑप्शन निवडतात. तसेच काही लोक स्ट्रेट हेयर ट्रेन्ड फॉलो करण्यासाठीही स्ट्रेट हेयर ट्रेन्ड फॉलो करतात. पण अशाही काही व्यक्ती आहेत ज्या स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंगपैकी काय करावं यामध्ये गोंधळून जातात. जाणून घेऊया दोघांपैकी काय करणं योग्य ठरतं त्याबाबत...

काय आहे हेअर स्मूदनिंग?

हेअर स्मूदनिंग एक केमिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये केसांना फॉर्मेल्डिहाइड सोल्यूशनमधये सॅच्युरेट करण्यात येतं. सॅच्युरेशननंतर त्यांना हीटिंग आयर्नने स्ट्रेट करून सुकवण्यात येतं. दरम्यान, फॉर्मेल्डिहाइला कोणत्याही एक्सपर्टच्या सुपरव्हिजनमध्येच करणं फायदेशीर ठरतं. 

स्मूदनिंग करण्याचे साइड इफेक्ट्स

स्मूदनिंगमुळे स्किन, डोळे आणि श्वसननलिकेला त्रास होऊ शकतो. 

काय आहे स्ट्रेटनिंग?

हेअर स्ट्रेटनिंगमध्ये हेअर रिबिल्डिंग असतं. यामध्ये जे केमिकलस वापरण्यात येतात. ते केसांच्या शॅफ्टचा बॉन्ड तोडून टाकतात. त्यांना हिट करून हा बॉन्ड पुन्हा तयार करण्यात येतो. त्यानंतर जे नवीन बॉन्ड तयार होतात. त्यांना जोडण्यासाठी केमिकल्सचा वापर करण्यात येतो. या प्रोसेसला थर्मल रिकंडिशनिंग असंही म्हणतात. 

स्ट्रेटनिंगचे साइड इफेक्ट्स 

स्ट्रेटनिंग करताना केसांना जास्त नुकसान पोहोचतं. केमिकल्स आणि केसांच्या नॅचरल बॉन्डमध्य केलेले बदल यांमुळे केस कमजोर होतात. 

काय म्हणतात एक्सपर्ट्स?

जास्तीत जास्त एक्सपर्ट्स स्मूदनिंगला नेहमी स्ट्रेटनिंगपेक्षा उत्तम पर्याय मानतात. अनेकदा हे केसांच्या क्वालिटिवर डिपेन्ड असतं. जर तुमचे केस अकदम कर्ली असतील आणि तुम्हाला स्ट्रेट केस पाहिजे असतील तर स्मूदनिंगऐवजी स्ट्रेटनिंग करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच नॉर्मल केसांसाठी स्मूदनिंग करण्याचा सल्ला दिला जातो. 

टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Lifestyle hair care tips smoothening or hair straightening what is better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.