लिक्वीड आयलायनर की, पेन्सिल; यापैकी काय ठरतं बेस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:43 PM2019-05-09T15:43:00+5:302019-05-09T15:43:26+5:30
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आयलायनर उत्तम ऑप्शन आहे. अनेक महिला लिक्विड आयलायनर लावणं पसंत करतात, तर काही महिला पेन्सिल आयलायनर.
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आयलायनर उत्तम ऑप्शन आहे. अनेक महिला लिक्विड आयलायनर लावणं पसंत करतात, तर काही महिला पेन्सिल आयलायनर. परंतु जर तुम्ही पहिल्यांदा हे ट्राय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट ठरेल यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.
लिक्विड आयलायनर
लिक्विड आयलाइयनर डोळ्यांवर अगदी सहज लागतं. जर तुम्ही हे लावण्यासाठी एखादा टूटोरिअल व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला फार सोपं वाटेल. पण तसं नाही. लिक्विड आयलायनर लावणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला फार लक्ष द्यावं लागतं.
लिक्विड लायनरचा एक प्रॉब्लेम म्हणजे, हे अप्लाय करताना जरासाही हात लागला तरी हे सगळीकडे पसरतं. कारण असं केल्याने तुम्हाल पापण्यांवर फाउंडेशनपासून आयशॅडो सर्व गोष्टी काढून टाकाव्या लागतात. अनेकदा फाउंडेशन बेस पुन्हा चेहऱ्याशी मॅच करणं शक्य होत नाही.
जर लिक्विड आयलायनरला सुकण्याआधीच हात लागला किंवा डोळे उघडले तर ते सगळीकडे पसरतं. त्यामुळे संपूर्ण मेकअप पुन्हा करावा लागू शकतो. जर तुम्हाला लिक्विड लायनर लावता येत असेल तरच हा ऑप्शन निवडा.
पेन्सिल आयलायनर
पेन्सिल आयलायनरचा आकार स्केच पेनसारखा असतो. याची ग्रिप फार छान असते. यामुळे हे लावणं अगदी सहज शक्य होतं. फक्त तुम्ही बाजारातून पेन्सिल आयलायनर विकत घेताना स्मजप्रूफ आयलायनरचा ऑप्शन निवडा. याबाबत आणखी एक खास गोष्ट सांगायची झालं तर, हे लावताना जरी लाइन सरळ आली नसेल तरीही एका छोट्याशा स्ट्रोकने ते नीट करणं शक्य होतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.