Madhuri Dixit’s beauty secrets : ५० व्या पदार्पण करुनही माधुरी दीक्षितचे सौंदर्य जैसे थे, जाणून घ्या रहस्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 11:45 AM2017-06-14T11:45:26+5:302017-06-14T17:15:26+5:30
काय आहे माधुरीच्या सौंदर्याचे रहस्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!
Next
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित एक अशी अभिनेत्री आहे, जिला विसरणे आजही लोकांना कठीण झाले आहे. तिने आपला अभिनय आणि सौंदर्याने कित्येक लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिची स्माइल, तिचा डान्स, तिच्या डोळ्याचे हावभाव याची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. विशेष म्हणजे तिच्या या गुणांबरोबर तिचे सौंदर्य आजही म्हणजे ५० व्या वर्षात पदार्पण करुनही जैसे थे आहे. आजही माधुरीने स्वत:ला मेंटेन ठेवले आहे. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तिच चकाकी असून डोळ्यांची चमकदेखील कमी झाली नाही.
* माधुरी कशी घेते स्वत:ची काळजी !
संतुलित दिनचर्या आणि काही चांगल्या सवयी हेच माधुरीच्या सौंदर्याचे आणि सुदृढ शरीराचे गुपित आहे. ती कधीही धुम्रपान आणि मद्यपान करीत नाही. ती आहार आणि व्यायामावर विशेष लक्ष देते. ती एका आठवड्यात किमान सहा दिवस तरी व्यायाम करते आणि डान्स हा तिचा वर्क आउटचा महत्त्वाचा भाग आहे. तिचे असे म्हणणे आहे की, डान्स केल्याने तिला जो आनंद मिळतो तो दुसरे काही केल्याने अजिबात मिळत नाही. ती मल्टि विटॅमिन्सलाही महत्त्व देते मात्र, जर संतुलित आहार असेल तर याची गरज नाही.
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी ती दर दिवशी आपला चेहरा एका क्लिन्झरने धुते आणि त्यानंतर एक सीरमचा वापर करते. कधी-कधी त्वचेच्या आवश्यकतेनुसार टोनरचा वापर करते. ती मॉइश्चरायझरवरही भर देते.
शिवाय सौंदर्य टिकविण्यासाठी ती रात्री कधी उशिरा जागत नाही, वेळेवर झोपते. यामुळे ती सकाळी फे्रश फिल करते. हे देखील चांगल्या सौंदर्याचे गुपित आहे.
विशेष म्हणजे ती आपल्या केसांची काळजी घरगुती उपायांनीच घेते. ती केसांना धुण्याअगोदर आॅलिव्ह तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात एकत्र करुन आपल्या केसांना लावते. यामुळे केस मजबूत होतात, ज्यामुळे केसांवर कोणत्याही ऋुतूत परिणाम होत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी ती कंडिशनिंगलाही महत्त्व देते. ती केळ किंवा अन्य फळांपासून बनविलेल्या कंडिशनरचा वापर करते.
Also Read : Beauty Tips : प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !
: ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !