घरच्या घरी 'रीठा'पासून तयार करा शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 11:44 AM2019-10-08T11:44:08+5:302019-10-08T11:54:22+5:30

रीठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आपले केस सुंदर, दाट आणि काळे असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. बाजारातील महागड्या उत्पादनांपासून ते पार्लर ट्रिटमेंटपर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेण्याच येतो.

Make shampoo conditioner and hair mask from reetha seeds in own home | घरच्या घरी 'रीठा'पासून तयार करा शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क

घरच्या घरी 'रीठा'पासून तयार करा शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क

googlenewsNext

रीठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आपले केस सुंदर, दाट आणि काळे असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. बाजारातील महागड्या उत्पादनांपासून ते पार्लर ट्रिटमेंटपर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेण्याच येतो. यासर्व उपायांमध्ये अनेक पैसेही खर्च करण्यात येतात. पण रिझल्ट मात्र मिळत नाही. केमिकलयुक्‍त शॅम्पू, कंडिशनरचा वापर आणि ट्रिटमेंटमुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. याचा परिणामही जास्त दिवस राहत नाही. अशातच केसांना घरगुती किंवा नैसर्गिक उपायांनी सुंदर करणं सर्वात फायदेशीर ठरतं. 

केसांसाठी रीठापेक्षा उत्तम दुसरं काहीच नसतं. यामुळे केस सुंदर, मजबुत आणि चमकदार होतात. बाजारात उपलब्ध असणारा शॅम्पू आणि कंडिशनरमध्येही रीठाचा वापर करण्यात येतो. पण त्याचबरोबर इतर केमिकल्सही असतात. जे केसांना नुकसान पोहोचवतात. अशातच आज आम्ही तुम्हाला घरातच रीठा आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरपासून शॅम्पू आणि कंडिशनर तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. 

शॅम्पू तयार करण्यासाठी रीठा 

सर्वात आधी आवळा, शिकेखाईसोबत रीठाच्या काही बिया पाण्यात 30 ते 40 मिनिटांसाठी उकळून घ्या. त्यानंतर स्मॅश करा. हे रात्रभर पाण्यातच ठेवा. सकाळी पाणी गाळून त्याचा शॅम्पू म्हणून उपयोग करा. रीठापासून तयार करण्यात आलेला शॅम्पूचा जास्त फेस होत नाही. 

रीठापासून तयार केलेल्या शॅम्पूचे फायदे... 

केसांमधील कोंडा आणि केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी हा शॅम्पू मदत करतो. डोक्याला येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळते. यामध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियन गुणधर्म असतात. स्काल्पची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठीही मदत होते. 

रीठापासून तयार केलेल कंडिशनर... 

प्रदूषण आणि धूळीमुळे केसांना कंडिशनर करण्याची गरज असते. बाजारात असलेलं सोडिअम लॉरिल सल्फेट आणि पराबेन कंडिशनरमुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. यापासून बचाव करण्यासाठी घरीच रीठापासून कंडिशनर तयार करता येऊ शकतो. त्यासाठी रीठा रात्रभर पाण्यात भिजवत ठेवून सकाळी गाळून घ्या. कंडिशनर तयार आहे. 

रीठा कंडिशनरचे फायदे... 

रीठापासून तयार केलेलं कंडिशनर केसांना चमक देण्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत करतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं. त्यामुळे केस अजिबात गळत नाहीत. तसेच केसांचा गुंताही होत नाही. 

हेअर मास्क तयार करण्याची पद्धत... 

कधी कधी केस कोरडे आणि निस्तेज होतात. अशातच हेअर मास्कमुळे केस सुंदर होण्यास मदत होते. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे आणि वेळ खर्च करावा लागणार नाही. घरीच रीठाचा वापर करून अगदी सहज हेअर मास्क तयार करू शकता. सुकलेला आवळा आणि रीठा रात्रभर भिजत ठेवा आणि दोन्ही एकत्र करा. यामध्ये उन्हात सुकवलेली जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या आणि दही एकत्र करा. जर तुमच्या स्काल्पची त्वचा तेलकट असेल तर थोडीशी मुलतानी मातीही एकत्र करू शकता. 

सर्व गोष्टींचं मिश्रण तयार करून रात्रभरासाठी ठेवा. सकाळी गाळून घ्या. आता केस आणि केसांच्या मुळांना तयार मिश्रणाने मसाज करून एक तासासाठी तसचं ठेवा. पाण्यामध्ये रीठा तोपर्यंत उकळत ठेवा जोपर्यंत ते मुलायम होणार नाही. त्यानंतर पाण्यातून काढून हे स्मॅश करा. आता तयार रीठा शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा. 

फायदे... 

रीठा केसांचं सौंदर्य राखण्यासाठी आणि मुलायम करण्यासाठी मदत करतो. तसेच डोकं शांत ठेवण्यासाठी मदत करतो. स्काल्पमध्ये जमा झालेली धूळही दूर करतो. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Make shampoo conditioner and hair mask from reetha seeds in own home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.