हिवाळ्यात रुक्ष त्वचेला बनवा मुलायम..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 04:47 PM2016-11-17T16:47:53+5:302016-11-17T16:47:53+5:30

हिवाळ्यात वातावरणाच्या बदलाचा परिणाम शरीरावर होऊन त्वचा रुक्ष होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेडसावते. थंडीचा जास्त परिणाम हा त्वचेवर होत असून त्वचा रखरखीत बनते.

Make the skin dry in the winter. | हिवाळ्यात रुक्ष त्वचेला बनवा मुलायम..

हिवाळ्यात रुक्ष त्वचेला बनवा मुलायम..

Next
ong> -Ravindra More

हिवाळ्यात वातावरणाच्या बदलाचा परिणाम शरीरावर होऊन त्वचा रुक्ष होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेडसावते. थंडीचा जास्त परिणाम हा त्वचेवर होत असून त्वचा रखरखीत बनते. त्यामुळे आपले सौंदर्य नक्कीच खालावते. आजच्या सदरात रुक्ष त्वचेला मुलायम बनवून सौंंदर्य कसे टिकवाल याबाबत जाणून घेऊया...



हिवाळ्यातील गार हवा आपल्या चेहऱ्यावरचे तेज गायब करते. त्यामुळे आपली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. कित्येक जणांच्या त्वचेला तर तडे पडून त्यातून रक्त निघू लागते. अशा परिस्थितीत आपण मॉयश्चरायजरसोबतच फेस आॅइलचा वापर करु शकता. यामुळे गार हवेतही आपले सौंदर्य टिकून राहील. या शिवाय आपण काही सोप्या टिप्सचा उपयोग करुन हिवाळयातही सुंदर दिसू शकता. 

हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होत असल्याने दिवसातून दोन वेळा मॉयश्चरायजर करावे, मात्र याचे प्रमाण जास्त नको, कारण यामुळे आपली त्वचा तैलीय आणि काळसर दिसू लागेल. क्रीम बेस्ड जेलदेखील प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. याशिवाय आपण बायो आॅइलचाही वापर करु शकता, कारण हे आॅइल नुसतेच एंटी-एजिंगसाठी मदत नाही करत तर आपल्या त्वचेलादेखील पोषण प्रदान करते. शिवाय आपल्या त्वचेत एक सुरक्षात्मक लेयर बनविते ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. 

जास्त गरम पाण्याने आंघोळ नको
गरम पाण्याने आपल्या शरीरातील नैसर्गिक आॅइलला नष्ट करते, आणि आपली त्वचा अगोदरपासूनच कोरडी असेल तर आपल्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे खूप नुकसानकारक होऊ शकते. यामुळे हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.  

डायटमध्ये करा विटॅमिन्सचा वापर
सुंदर, ग्लोइंग आणि मुलायम त्वचा हवी असल्यास डायटमध्ये विटॅमिन्सचा वापर करू शकता. त्यात ग्लोइंग स्कीनसाठी ओमेगा ३ चे प्रमाण आहारात वाढवा. ऋतुनूसार भाजीपाला आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे. रुक्ष आणि साखरयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, कारण यामुळे त्वचेला नुकसान होते. आपली त्वचा अगोदरपासूनच कोरडी असेल तर हिवाळ्यात ही समस्या आणखीनच वाढते सोबतच शरीरात रेडनेस देखील येते. यापासून बचावासाठी ओटमील किंवा कॉफी पाउडरला क्रीममध्ये मिक्स करून लावा. यामुळे आपल्या त्वचेतील रुक्षपणा कमी होऊन मुलायम होण्यास मदत होईल. 

Web Title: Make the skin dry in the winter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.