घरीच तयार करा 'हे' फ्रूट फेस पॅक; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी होइल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 03:15 PM2019-03-06T15:15:48+5:302019-03-06T15:20:32+5:30
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण त्याऐवजी जर घरामध्ये उपलब्ध पदार्थांचा वापर केला तर त्वचेच्या सर्व समस्यांसोबतच त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते.
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण त्याऐवजी जर घरामध्ये उपलब्ध पदार्थांचा वापर केला तर त्वचेच्या सर्व समस्यांसोबतच त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. दररोज फळांचं सेवन करणं जेवढ आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तेवढंचं त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयोगी ठरतं. फ्रूट पॅक लावून मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं त्वचेचं सौंदर्य वाढवू शकता. सुंदर त्वचेसाठी घरच्या घरीच फ्रूट फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावा आणि सौंदर्य वाढवा.
द्राक्षं
द्राक्षाचे दोन तुकडे करून चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करा. ही गोष्ट लक्षात ठेवा की, द्राक्ष चेहरा आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या सुरकुत्यांवर राहतील. जवळपास 20 मिनिटं चेहरा तसचं ठेवा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. द्राक्षांचा फेस पॅक सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी मदत करतं.
केळी
केळ्याची साल काढून ते एका बाउलमध्ये स्मॅश करून एक पेस्ट तयार करा. संपूर्ण चेहऱ्यावर पेस्ट लावा आणि 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा कोरडा करा आणि गुलाब पाणी लावा. केळ्यापासून तयार केलेलं फेस पॅक टॉनिकचं काम करतं आणि त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं.
सफरचंद
कच्चं सफरचंद किसून चेहऱ्यावर लावा. 10 ते 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामध्य तुम्ही बेसन किंवा पिठंही एकत्र करू शकता. या फेसपॅकमुळे काही मिनिटांमध्येच त्वचेचं सौंदर्य वाढण्यास मदत होते. सफरचंद त्वचा स्वच्छ करण्यासोबतच सुरकुत्या आणि सूज कमी करण्यासाठीही मदत करतं.
स्ट्रॉबेरी
3 ते 4 स्ट्रॉबेरी व्यवस्थित स्मॅश करून घ्या. त्यानंतर यामध्ये दही आणि ओटमील एकत्र करा. चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटांसाठी तसंच ठेवा. हे फेस पॅक ऑयली स्किनसाठी उत्तम ठरतात. जर तुमची स्किन ऑयली असेल आणि जेव्हा चेहरा डल दिसेल तेव्हा हा मास्क ट्राय करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.