घरीच बनवा टॅन रिमूव्हल स्क्रब !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 09:21 AM2017-03-19T09:21:42+5:302017-03-19T14:51:42+5:30
उन्हात टॅन झालेली त्वचा खराब दिसू लागते आणि आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. मग सौंदर्य टिकविण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप पैसे वाया घालतो.
Next
ब ह्य वातावरणाचा त्वचेवर प्रभाव पडतोच. त्यातच उन्हाळ्यात तर त्वचेचा पोतच खराब होतो. उन्हात टॅन झालेली त्वचा खराब दिसू लागते आणि आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. मग सौंदर्य टिकविण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप पैसे वाया घालतो. एवढे करु नही चांगले परिणाम मिळत नाही. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरच्या घरी काकडी आणि साखर पासून बनविलेल्या स्क्रबने त्वचेवरील टॅनिंग काढू शकता. फक्त आम्ही दिलेल्या खालील टिप्स फॉलो करा.
बॉडी स्क्रबर
हे स्क्रबर काकडी व साखर मिसळून बनवले जाते. हे स्क्रब काळेपणा दूर करून गोरे बनवण्यास मदत करते. सन बर्न व टॅनिंगची समस्या स्क्रबमुळे दूर होते. या स्क्रबमध्ये आॅलिव्ह आॅईल मिसळल्याने त्वचा हायड्रेट होऊन त्वचेला ओलावा मिळतो. काकडीत ब्लिचिंगचे गुण असल्यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
स्क्रबर बनवण्याचे साहित्य
काकडीचा रस, कोरफड गर, साखरेची पूड, आॅलिव्ह आॅईल
स्क्रब कसा तयार कराल
स्क्रबर बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी किसून रस काढून घ्या. आता यामध्ये कोरफड, साखरेची पूड व दोन थेंब आॅलिव्ह आॅईल मिसळा. तुमचा बॉडी स्क्रब तयार आहे.
स्क्रब कसा वापराल
हा स्क्रब टॅन झालेल्या त्वचेवर लावून १५ ते २० मिनिटे ठेवा. सुकल्यावर हलक्या हाताने घासून स्क्रब त्वचेवर लावा. आठवड्यातून तीन ते चार दिवस असे करा. एका आठवड्यात त्वचेचा पूर्वीचा रंग परत येईल.