​स्वत:ला बनवा ‘परफेक्ट’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 09:47 AM2016-09-14T09:47:05+5:302016-09-14T15:17:05+5:30

आज प्रत्येकाला वाटते की, आपले जीवन सुखी, आनंदी, उत्साही, शांततामय, निरोगी असायला हवे.

Make yourself 'Perfect'! | ​स्वत:ला बनवा ‘परफेक्ट’ !

​स्वत:ला बनवा ‘परफेक्ट’ !

Next
n style="color:#FF0000;">-रवींद्र मोरे 

आज प्रत्येकाला वाटते की, आपले जीवन सुखी, आनंदी, उत्साही, शांततामय, निरोगी असायला हवे. मात्र बऱ्याचदा अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येते की, त्यामुळे आपले निर्णय बदलतात आणि आपले आयुष्य वेगळ्याच ठप्प्यावर वळण घेतं. त्यावेळी एकतर स्वत:ला बदलायला वेळ नसतो आणि परिस्थितीतर मुळीच बदलू शकत नाही. मग अशावेळी पश्चात्तापाशिवाय आपल्याजवळ काहीच नसते. कदाचित आपली निर्णय क्षमता जर बळकट राहिली असती तर ही वेळ आली नसती. 

मग ही निर्णय क्षमता सर्वांचीच बळकट असायला हवी. त्यासाठी मात्र आपल्याला ‘परफेक्ट’ होणे म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे. 

चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी स्वत:ला परफेक्ट बनविण्यासाठी खूपच मेहनत घेतात. उदाहरण द्यायचे म्हणजे बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान. आमिरने स्वत:ला परफेक्ट बनविण्यासाठी अजोड मेहनत केली असल्यामूळेच हे शक्य झाले आहे. 

आजच्या फीचरमधून आपण स्वत:ला ‘परफेक्ट’ कसे बनवायचे हे जाणून घेऊया...

असे बनवा स्वत:ला परफेक्ट...

* परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवा. विशेष म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत नाही त्या मुळात करुच नका. आणि जे काम तुम्ही यापुढे करु शकत नसाल, तर ते काम करणे थांबवा. मग त्यासाठी तुम्हाला वेळ लागला तरी चालेल. 

* एकावेळी एकच काम करा. असे करण्यात तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम मिळेल आणि आपल्या मनाला आनंद देखील मिळेल. 

* प्रत्येक रविवारी कमीत कमी १० ते १५ मिनीट वेळ काढुन संपूर्ण आठवड्याचे नियोजन करा. यात अति महत्त्वाच्या कामांना प्राधान्यक्रम द्या. यामुळे आपण आठवडाभराच्या कामांना सहज आणि सोप्या पद्धतीने निश्चिंत करु शकता. 

* घरात ज्या खाद्यपदार्थांची गरज असते, त्यांची खरेदी आठवड्याच्या सुरुवातीला एकाचवेळी करा. यामुळे आपला वेळ, ऊर्जा आणि पैशांचा अपव्यय होणार नाही. 
 
* एका वर्षापासून ज्या वस्तूंचा आपण उपयोग केला नसेल त्या वस्तूंना एकतर आपल्या मित्रांना द्या नाहीतर फेकून द्या. ज्या वस्तू सध्यस्थितीत वापरत आहात त्यांचा सदुपयोग करा. 
 
* रोज स्वत:ला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारा की, ‘आता कोणती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी मी करू शकतो? तसेच परिस्थिती साधी आणि सोपी बनविण्यासाठी कोणते पाऊल मला उचलायचे आहेत? 

* रोज एक तरी असे दयाळूपणाचे काम करा. निंदा तर मुळीच कुणाची करू नका.  

* आपल्या विचारात नकारात्मता असेल तर ती बदलवा आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करा. यामुळे आपल्यात एक नवीन ऊर्जा तयार होऊन आपली कामे सहज आणि सोपे होतात. 

* कोणतेही काम करण्याआधी स्वत:च्या मनात एक प्रबळ ईच्छाशक्ती जागृत करा, यामुळे अपेक्षित ध्येय गाठता येईल. 

* नेहमी आपल्या स्मरणात महत्त्वाच्या गोष्टी राहतील याची काळजी घ्या. ही सवय लावल्यास आपली मेमरी स्ट्रॉँग होईल. 

* आपल्यात संवादकला असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. लोकांशी बोलताना नेहमी विचार करुनच बोलावे. 

* आपण सर्वज्ञानी आहोत हा अहमंपणा नसावा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शिकले पाहिजे.

* आयुष्यात हास्यविनोदाला महत्त्वाचे स्थान द्या. रोज काही प्रमाणात का होईना खळाळून हसले पाहिजे. 

* दिवसभर आपण जे काही योग्य - अयोग्य कामे केले असतील, या घटनांची उजळणी रात्री झोपायच्या आधी करा. आणि त्यावर मननदेखील करा. यामुळे आपल्यातील अवगूण आपोआपच कमी होतील आणि आपण परफेक्ट बनू. 

Web Title: Make yourself 'Perfect'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.