नेहमी फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी मेकअपच्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवा लक्षात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 12:02 PM2019-08-09T12:02:03+5:302019-08-09T12:10:15+5:30
सामान्यपणे मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं मेकअप उठून दिसेल. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
(Image Credit : www.insider.com)
मेकअप करण्याचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा मेकअपमुळे तुमचं सौंदर्य खुलेल. पण अनेकदा मेकअप करताना काही चुका केल्याने त्वचा खुलण्याऐवजी डल दिसू लागते. सामान्यपणे मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं मेकअप उठून दिसेल. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
१) नेहमी चेहरा धुतल्यानंतर मेकअपआधी चेहऱ्यावर टोनर किंवा एस्ट्रिजेंट लावा. याने मेकअप जास्तवेळ टिकून राहील.
२) फाउंडेशन लावण्याआधी हलक्या भिजलेल्या त्वचेवरच तुम्ही मॉइश्चरायजर लावू शकता. याने त्वचा एकसारखी दिसेल आणि चेहऱ्यावर चमक येईल.
(Image Credit : India.com)
३) ऑयली त्वचेवर मलाईमध्ये लिंबाचा रस मिश्रित करून चेहऱ्यावर लावा. याने त्वचा मुलायम होईल.
४) लो क्वॉलिटीची टिकली किंवा लिपस्टिक वापरू नका. याने एलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. याने तुमचं सौंदर्य खुलण्याऐवजी त्वचा खराब होऊ शकते.
५) रोज रात्री झोपण्यापूर्वी चांगल्याप्रकारे मेकअप स्वच्छ करा. याने त्वचेवरील रोमछिद्रे मोकळी होतात आणि मोकळा श्वास घेऊ शकतात. तसेच याने चेहरा सकाळी फ्रेश दिसतो.
(Image Credit : www.rd.com)
६) रात्री झोपण्यापूर्वी चेहरा क्लेजिंग मिल्कने नक्की साफ करा. याने त्वचेतील एक्स्ट्रा ऑइल निघून जातं.
७) त्वचा चांगली आणि तजेलदार ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर कंट्रोल ठेवणे फार गरजेचे आहे. सोबतच सकाळी थोडं फिरायला जाणे आणि व्यायाम करणे विसरू नका. याने तुमचं शरीर फिट राहतं आणि सौंदर्यही कायम राहतं.
(Image Credit : parenting.firstcry.com)
८) रोज कमीत कमी सहा ते सात तास झोप घेणे फ्रेश दिसण्यासाठी महत्त्वाचे आहे. चांगली झोप घेतल्याने शरीर निरोगी तर राहतच सोबतच चेहऱ्यावर फ्रेशनेसही दिसतो.
९) केस निरोगी ठेवण्यासाठी केसांची आठवड्यातून एकदा आवर्जून मालिश करा. याने केसांना मजबूती मिळेल.
१०) निरोगी त्वचा मिळवण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि थोडा लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करा.
११) आहारात कडधान्य आणि वेगवेगळ्या फळांचा, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. याने तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य मिळेल. सोबतच आरोग्यही चांगली राहील.