चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट लावा; मग पाहा कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:05 PM2019-09-19T17:05:05+5:302019-09-19T17:06:50+5:30
सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते.
सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते. पण अनेकदा मेकअप करताना चुका करतात. त्यामुळे चेहऱ्याच्या लूकसोबतच त्वचेच्याही समस्या उद्भवतात. कोणत्याही मेकअपचा बेस लावण्याआधी प्रायमर लावणं अत्यंत आवश्यक आहे. पण मुली अनेकदा मेकअपच्या स्टेप्स विसरतात. ज्यामुळे मेकअपमुळे तो ग्लो येत नाही. जाणून घेऊया प्राइमर लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचा योग्य वापर...
प्राइमर म्हणजे मेकअपमधील सर्वात पहिलं आणि मेकअपचा बेस व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं कॉस्मॅटिक प्रोडक्ट. यामुळे मेकअप बिघडत नाही. प्राइमर हाताच्या बोटांच्या सहाय्याने चेहऱ्याच्या फक्त त्या भागात लाव ज्याभागात स्किन पोर्स जास्त आहेत. हे क्रिमप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर लावण्याची गरज नसते. मेकअप करताना सर्वात आधी चेहऱ्यावर प्रायमर लावण्याचा सल्ला देण्यात येतो. पण तुम्ही चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात आधी मॉश्चराईज लावा. त्यानंतर प्रायमर लावा. असे केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येईल. प्रायमर लावण्यामुळे तुम्ही केलेला मेकअप चेहऱ्यावर दिर्घकाळ टिकण्यासही मदत होते.
स्किन टाइपनुसार निवडा प्राइमर :
- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल प्राइमरचा वापर करा.
- जर तुमची त्वचा ड्राय असेल तर क्रिम बेस्ड प्राइमरचा वापर करा.
- नॉर्मल स्किनसाठी जेल प्राइमरचा वापर करा. यामुळे मेकअप फ्लॉलेस दिसतो.
प्राइमर लावण्याची पद्धत :
- सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा
- त्यानंतर चेहरा कोरडा करा.
- आता चेहऱ्यावर मॉयश्चरायझर अप्लाय करा. त्यानंतरच प्राइमर लावा.
- प्राइमर डोळ्यांखाली, गालांवर आणि भुवयांच्या खाली व्यवस्थित लावा.
- प्राइमर लावण्याचा फंडा हाच आहे की, स्किनवर व्यवस्थित टॅप करत लावा.
- आता थोडा वेळासाठी स्किन असचं ठेवा.
- नो-मेकअप लूकसाठी तुम्ही फाउंडेशन अजिबात लावू नका. फक्त प्राइमरही पुरेसं असतं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)