अंघोळ झाल्यानंतर 'या' चुका केल्यामुळे वयाआधीच दिसत आहात म्हातारे, वाचा कोणत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:05 PM2020-04-23T13:05:23+5:302020-04-23T13:17:22+5:30
बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं.
आपली त्वचा आयुष्यभर तरूण आणि तेजस्वी दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. जरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी रोजच्या जगण्यात काही चुका केल्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसता.
रोज अंघोळ केल्यानंतर अनेकदा लोक चुका करतात. याचा परिणाम फक्त त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा होतो. यामुळेच कमी वयातील लोक सुद्धा ४० ते ४५ वयोगटातील असल्यासारखे दिसतात. पण या सवयींना बदलता येऊ शकतं. यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसू शकता.
केसांना आणि तोंडाला साबण लावणं
अंघोळ करत असताना चेहरा आणि केसांना साबण लावल्यामुळे केस डॅमेज होतात. साबण हा अनेकदा हार्ड असतो. त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते. त्यासाठी अंघोळ करत असताना फक्त अंगाला साबण लावा, चेहरा फेसवॉशने धुवा. केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. काही साबण मॉश्चराईजिंग आणि हलके क्रिमी असतात. तुम्ही आपल्या त्वचेवर अशा साबणाचा वापर करू शकता. पण सामान्य साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.
टॉवेलचा वापर
चेहरा किंवा केस पुसायला तुम्ही जुन्या किंवा रोजच्यारोज धुतल्या जात नसलेल्या टॉवेलचा वापर करत असाल, तर ही चूक तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी महागात पडते. चेहरा आणि केसांची त्वचा खूप सेंसिटिव्ह असते. म्हणून मऊ आणि रोज धुत असलेल्या टॉवेलचा वापर चेहरा पुसण्यासाठी करा
अंघोळ केल्यानंतर मॉईश्यचराईजर न लावणे
अंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीराला मॉइश्चराईजर लावायला हवं. कारण साबणाने अंघोळ केल्यामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. पण रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर मॉईश्चराईजरचा वापर केल्यामुळे त्वचा मऊ राहते. ( हे पण वाचा-३० वयानंतर पुरूषांनी तरूण दिसण्यासाठी करा 'हे' उपाय, तिसरा उपाय सगळ्यात इफेक्टीव्ह)
केसांना तेल न लावणे
केसांना तेल न लावल्याने पोषण मिळत नाही. त्यामुळे केस गळायला सुरूवात होते. जर तुम्ही केसांमध्ये हेअर जेल, क्रिम लावत असाल तर केसांची अवस्था खराब होऊन केस गळायला सुरूवात होते. केसांना तेल लावल्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्यासाठी तुम्ही नारळाचं तेल, बदामाचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. त्यामुळे केसांना पोषण मिळून केस मजबूत राहतील. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी ताक वापरून ग्लोईंग स्किन मिळवा आणि सुरकुत्यांचं टेंशन विसरा)