'हे' आहे हॉट आणि सेक्सी मलायकाच्या तरूण त्वचेचं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:18 PM2019-05-14T13:18:02+5:302019-05-14T13:20:25+5:30
बॉलिवूड सेलिब्रिटी मलायका अरोरा जरी चित्रपटांपासून दूर असली तरिही आपली फॅशन स्टाइल आणि सोशल अॅक्टिव्हीटीज, हॉलिडे फोटो आणि मित्रांसोबत केलेल्या आउटिंगच्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
बॉलिवूड सेलिब्रिटी मलायका अरोरा जरी चित्रपटांपासून दूर असली तरिही आपली फॅशन स्टाइल आणि सोशल अॅक्टिव्हीटीज, हॉलिडे फोटो आणि मित्रांसोबत केलेल्या आउटिंगच्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी नेहमीच चाहत्यांना भूरळ घालणारी मलायका अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईतही आहे. आजही मलायकाची ग्लोइंग स्किन आणि सेक्सी फिगर पाहून हे कोणीही म्हणणार नाही की, मलायका 45 वर्षांची असून तिला 16 वर्षांचा एक मुलगा आहे. अशातच नक्की मलायकाच्या या ग्लोइंग आणि सुंदर स्किनचं गुपित आहे तरि काय? असा प्रश्न येणं सहाजिकचं आहे.
खरं तर मलायकने आपलं हे सीक्रेट स्वतःच सर्वांना सांगितलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली असून त्यामध्ये तिने आपल्या चेहऱ्यावर कोरफडीचं जेल लावतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने एक पोस्टही लिहीली आहे. त्यामध्ये मलायका म्हणते की, आपल्या स्किनची काळजी आपण अगदी सहज आणि नैसर्गिक स्वरूपात घेण्यासाठी मला एक बेस्ट गोष्ट सापडली आहे. मी या जेलच्या खरचं प्रेमात पडले आहे. मी या कोरफडीच्या जेलचा उपयोग योगाभ्यास, शूट, मेकअप आणि उन्हामध्ये बाहेर जाण्याआधी आणि नंतर असं दोन्ही वेळी करते. हे कोरफडीचं जेल आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे 24 तास माझ्या त्वचेची काळजी घेऊन तिला हेल्दी आणि हॅपी ठेवतं.
कोरफडीच्या गराचे फायदे :
- कोरफडीचा गर तुम्हाला सनबर्न, मॉयश्चरायझर, मेकअप रिमूव्हर. अॅन्टी एजिंग जेल, स्क्रब, आयब्रो जेसोबत अनेक प्रकारे चेहऱ्यावर वापरू शकता.
- कोरफडीचा गर चेहऱ्यावर चिपचिपीत लूक किंवा ग्रीजी लूक न देता चेहरा मॉयश्चरायइज करतो. अशातच ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी हे अत्यंत उपयोगी ठरतं.
- वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठीही हा गर अत्यंत फायदेशीर ठरतो. अशातच कोरफड एक अॅन्टीएजिंग एलिमेंट म्हणून काम करतं.
- कोरफडीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखी अॅन्टीऑक्सिडंट तत्व आढळून येतात, जी स्किन नॅचरली हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात.
- कोरफड त्वचेच्या आतमध्ये जाऊन स्किन मॉयश्चराइज करते आणि अनेक क्रॉनिक स्किन आजार जसं सोरायसिस, पिंपल्स आणि एग्जीमा इत्यादी समस्या दूर करतं.
- उन्हाळ्यामध्ये स्किन टॅनिंगच्या समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. अशातच कोरफडीचं जेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. 2 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये 1 चमचा लिंबू आणि थोडीशी मध एकत्र करून लावा. स्किन टोन उत्तम राहतो.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.