महिन्यातून किती वेळा फेशियल करता? त्वचेचं होतय नुकसान,जाणून घ्या कसं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 05:33 PM2020-02-03T17:33:36+5:302020-02-03T17:36:52+5:30
चेहरा आणि त्वेचचं सौदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला फेशियल करतात.
(image credit- paras hospital)
चेहरा आणि त्वेचचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला फेशियल करतात. आपल्या त्वेचवर ग्लो असावा असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून वेगवेगळ्या महागड्या कंपन्याचे ब्लीच किंवा फेशियल आणि क्लिनअप महिला पार्लरमध्ये जाऊन करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का फेशियल करण्याचे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्वचा सुंदर करण्यासाठी तुम्ही फेशियल करता त्यामुळे त्वचेचं कसं नुकसान होतं.
खाज येण्याची समस्या केमिकलयुक्त क्रिम्स आणि कॉस्मॅटिक्सच्या वापरामुळे होते. असं अजिबात नसतं की पार्लरमध्ये ज्या क्रिम्स वापरतात. त्या सगळ्यांनाच सुट होतात. जर क्रिम तुमच्या त्वचेला सूट झाली नाही तर पिंपल्स येण्याची तसंच खाज येण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला क्रिम सुट होत नसेल तसंच मसाज करताना चुकीची पद्धत वापरली तर त्वचेवर पुळ्या येऊ शकतात. फेशियल केल्यानंतर सगळ्यात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे त्वचेची रोमछिद्र खुली होत असतात. त्यामुळे त्वचा तेलकट होत असते.
अनेकदा एलर्जी सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेचं नुकसान होतं. जर तुम्ही जर सतत ब्लीच किंवा फेशीयल करत असाल तर त्वचेची नैसर्गीक चमक कमी होण्याचा धोका असतो. तसंच त्वचा कोरडी सुद्धा पडते.
त्यासाठी महिन्यातून फक्त एकदा फेशियल करा.
जर तुमची त्वचा फार जास्त सूर्य किरणांच्या संपर्कात येत असेल तर सूर्याची प्रखर किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकते. याने त्वचा फार जास्त रखरखीत होते. . तसेच त्वचेवर सुरकुत्या, सूज आणि रखरखीतपणा येतो. यासाठी डी टॅनच्या क्रिमचा वापर करताना काळजीपूर्वक करा.
जर त्वचेवर पार्लरच्या फेशियलमुळे पुळ्या आल्या असतील किंवा खाजे येत असेल तर त्वरीत डॉक्टराशी संपर्क साधून उपचार घ्या. अन्यथा समस्या मोठी होण्याची शक्यता असते.