ना पार्लरचं टेंशन, ना खर्चाची कटकट; घरच्याघरी केळ्याच्या वापराने 'अशी' मिळवा सुरकुत्यांपासून सुटका

By manali.bagul | Published: December 15, 2020 05:39 PM2020-12-15T17:39:07+5:302020-12-15T17:50:04+5:30

Beauty Tips in Marathi : केळ्यामध्ये त्वचेला मॉइस्चराईज करणारे सर्व गुणधर्म असतात. केळ्यांचा फेसपॅक तयार करून तुम्ही अनेक दिवसांपर्यंत ठेवू शकता.

Massage your face with this banana paste to get glowing skin during winter | ना पार्लरचं टेंशन, ना खर्चाची कटकट; घरच्याघरी केळ्याच्या वापराने 'अशी' मिळवा सुरकुत्यांपासून सुटका

ना पार्लरचं टेंशन, ना खर्चाची कटकट; घरच्याघरी केळ्याच्या वापराने 'अशी' मिळवा सुरकुत्यांपासून सुटका

Next

ग्लोईंग त्वचा प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो. हिवाळ्यात त्वचा  कोरडी पडते. अनेकांच्या तोंडांवर सुरकुत्या येतात. तर कोणाचा चेहरा काळा पडतो. नेहमी पार्लरला जाणं शक्य होतं नाही. जरी पार्लरला गेलो तरी अनेकदा जास्त पैसै मोजूनही मनासारखा ग्लो मिळत नाही.  तुम्हीसुद्धा या सगळ्याला वैतागला असाल किंवा आकर्षक आणि ग्लोईंग त्वचेसाठी काय करता येईल असा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. केळ्याचा वापर करून तुम्ही डाग विरहीत चांगला चेहरा मिळवू शकता.

केळ्यामध्ये त्वचेला मॉइस्चराईज करणारे सर्व गुणधर्म असतात. केळ्यांचा  फेसपॅक तयार करून तुम्ही अनेक दिवसांपर्यंत ठेवू शकता. आपण गरजेनुसार रोज देखील तयार करू शकता. आता आपण केळ्याचा फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

सगळ्यात आधी केळी, मिल्क पावडर आणि एलोवेरा जेल हे साहित्य जवळ ठेवा. केळी घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. नंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट बनवा. नंतर या केळीच्या पेस्टमध्ये मिल्क पावडर आणि कोरफड जेल घाला. आता सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा, जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत.

असा करा वापर

केळीची पेस्ट तोंड स्वच्छ धूवून मग लावा आणि मग संपूर्ण तोंडाला चांगले मालिश करा. डोळ्याच्या खाली देखील त्याचा मालिश करा जेणेकरून आपली गडद डाग निघून जातील. 

फायदे

केळ्यामध्ये जीवनसत्त्वे-ए, बी, सी आणि ई असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे त्वचेच्या नुकसानाविरूद्ध लढण्यास मदत करतात. त्याचबरोबर केळीमध्ये असणारे अमायनो एसिड्स देखील आपल्या त्वचेला पोषण देते. जर आपल्या  तोंडावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली तर आपण केळ्याचा वापर करून त्वचेच्या आत कोलाजेन वाढवू शकता. त्यामध्ये सिलिका आढळते, ज्यामुळे सुरकुत्या दिसणे कमी होते.

काळ्या डागांनी चेहऱ्याचा लुक बिघडलाय? ग्लोईंग, आकर्षक त्वचेसाठी एक्सपर्ट्नी दिले ७ सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यामध्ये  एलोवेरा शरीराच्या ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते तसंच त्वचेला नुकसानापासून वाचवते. त्यात एंटीसेप्टिक, एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीएजिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेचे अनेक प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.

गळणाऱ्या आणि पांढऱ्या केसांना वैतागलात? एक्सपर्ट्सनी  दिलेल्या ५ उपायांनी समस्या होतील दूर 

हिवाळ्यात मिल्क पावडर चेहर्‍यावर लावल्यास काळे डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. हे चेहर्‍यावर नैसर्गिक चमक आणि ताजेपणा देखील परत आणते. फेस पॅक म्हणून वापरण्यासाठी आपण दही आणि लिंबू देखील त्यात घालू शकता.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Massage your face with this banana paste to get glowing skin during winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.