डोळ्यांखाली वर्तुळे कमी करण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 04:52 AM2017-03-06T04:52:34+5:302018-04-03T14:38:30+5:30

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही प्रत्येक वयोगटातील स्त्रीची सर्वसामान्य समस्या आहे. विशेष करून कॉम्पुटरसमोर सतत बसून काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनहेल्दी लाईफस्टाईलही या समस्येचे कारण आहे

Measures to reduce the cycles under the eyes | डोळ्यांखाली वर्तुळे कमी करण्याचे उपाय

डोळ्यांखाली वर्तुळे कमी करण्याचे उपाय

Next
ळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही प्रत्येक वयोगटातील स्त्रीची सर्वसामान्य समस्या आहे. विशेष करून कॉम्पुटरसमोर सतत बसून  काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कमी झोप घेणे हे या समस्येचे मुख्य कारण आहे. अनहेल्दी लाईफस्टाईलही या समस्येचे कारण आहे.
ही डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठीचे काही घरगुती उपाय.

1) डोळ्याखालील काळी वतुळे कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशी सर्व पोषणतत्त्वे शरीरात जातील असा आहार निवडावा. आहारात सर्व प्रकारची फळे, धान्ये,हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या, सुका मेवा यांचा समावेश असावा.आहारात अति मीठ वापर टाळावा.

2) वर्तुळे दूर करण्यासाठी टॉमाटो खूप फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिक पद्धतीने डोळ्याखालची वर्तुळे कमी होण्यास मदत होते. सोबतच त्वचाही कोमल आणि मुलायम होते. टॉमाटोच्या रसात लिंबूरस मिसळून लावल्याने लवकर परिणाम दिसून येतो.

3) बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवणे– डोळे मिटून त्याच्यावर बटाट्याचे काप ठेवल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होते.

4) बदामाचे तेल लावा -झोपण्याआधी डोळ्यांभोवती बदाम तेल लावून मसाज केल्याने व्हिटॅमिन ई चा पुरवठा होतो.

5)थंड दुधाच्या लेपानेही काळी वर्तुळे दूर होतात. कच्चे दूध थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने व्यवस्थित डोळ्यांखाली लावा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा. 

Web Title: Measures to reduce the cycles under the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.