'या' टिप्स फॉलो करा अन् दाढी वाढवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 07:52 PM2019-02-06T19:52:47+5:302019-02-06T19:54:51+5:30
सध्या अनेक तरूण लांब दाढी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. दाढी वाढवण्याचा आणि दाढीला वेगवेगळे कट देण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच वाढला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सही मागे नाहीत बरं...
सध्या अनेक तरूण लांब दाढी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. दाढी वाढवण्याचा आणि दाढीला वेगवेगळे कट देण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच वाढला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सही मागे नाहीत बरं... तसं पाहायला गेलं तर दाढी मुलांचा लूक आकर्षक करण्यासाठी मदत करते. तसेच दाढी असलेल्या मुलांकडे मुली अधिक आकर्षक होतात असाही रिसर्च असल्याने हा ट्रेंड अधिक वाढतोय. अशावेळ सर्वांनाच चांगली आकर्षक दाढी येते असे नाही. काहींना इच्छा असूनही दाढी ठेवता येत नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला चांगली दाट दाढी येऊ शकते. तुम्हीही अनेक दिवसांपासून दाढी वाढविण्यासाठी खास प्रयत्न करत असाल तर काही खास टिप्स तुमच्यासाठी...
पौष्टिक डाएट घ्या
काही लोकं व्यवस्थित डाएट घेत नाही. यामुळे अनेकदा केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. लक्षात घ्या की, तुम्ही ज्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही नियमितपणे आहारामध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-बी1, व्हिटॅमिन-बी6 आणि व्हिटॅमिन-बी12 घेत असाल तर ते केसांच्या वाढिसाठी मदत करतं.
व्हिटॅमिन डी युक्त आहार
डेड स्किन सेल्स काढून टाकल्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. खास पुरूषांसाठी असलेला चांगला एक्सफोलिएट मास्क ट्राय करू शकता. तुमच्या आहारामध्ये आणि ब्युटी प्रोडक्ट्समध्ये व्हिटॅमिन बीचा समावेश केल्याने फायदा होतो.
चेहऱ्यावर मसाज
चेहऱ्यावर मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवरील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. त्यामुळे दाढीचे केस वाढण्यास मदत होते. सोबतच चेहराही आणखी फ्रेश दिसतो.
डेली रूटीनमध्ये करा बदल
आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळण्यास मदत होते. तसेच पूर्ण झोप घेणंही आवश्यक आहे. दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी पिण आवश्यक आहे. यामुळे दाढीचे केस वाढण्यास मदत होते.
केस वाढू द्या
सुरुवातीला दाढीचे केस व्यवस्थित येणार नाहीत. त्यामुळे कदाचित तुमचा लूक बिघडू शकतो. त्यामुळे केस व्यवस्थित वाढू द्या. पूर्ण वाढल्यामुळे तुमचा लूक आणखी खुलून दिसेल.