जगभरातील पुरूष टक्कल पडण्याला वैतागले, रिसर्चचा दावा साखरेच्या दाण्यांमुळे परत येऊ शकतात केस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:38 PM2024-10-02T15:38:44+5:302024-10-02T15:41:02+5:30

Baldness : महिलांमध्येही केसगळती फार कॉमन समस्या आहे. पण पुरूष या समस्येने अधिक प्रभावित आहेत.

Men suffering from baldness study claims sugar grains can regrow hair | जगभरातील पुरूष टक्कल पडण्याला वैतागले, रिसर्चचा दावा साखरेच्या दाण्यांमुळे परत येऊ शकतात केस!

जगभरातील पुरूष टक्कल पडण्याला वैतागले, रिसर्चचा दावा साखरेच्या दाण्यांमुळे परत येऊ शकतात केस!

Baldness : आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे कमी वयातच अनेकांना केसगळतीची समस्या होत आहे. सामान्यपणे एका दिवसात १०० केस गळत असतील तर ही बाब सामान्य मानली जाते. पण यापेक्षा जास्त केस जात असतील तर तुम्हाला लवकर टक्कल पडू शकतं. याला मेडिकल भाषेत अलोपेसिया असंही म्हणतात. ही समस्या अनेकदा असंतुलित हार्मोन, स्ट्रेस, एखादा आजार, कमजोरी आणि जास्त स्मोकिंगमुळेही होते.

महिलांमध्येही केसगळती फार कॉमन समस्या आहे. पण पुरूष या समस्येने अधिक प्रभावित आहेत. मेल एंड्रोजेनेटिक एलोपेसिया पुरूषांमध्ये केसगळतीचा फार सामान्य प्रकार आहे. ही समस्या ५० वयापर्यंत जवळपास ३० ते ५० टक्के पुरूषांना होते.

अशात बरेच लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात किंवा पॅच लावतात. पण यासाठी भरपूर खर्च येतो. अशात यूनि्व्हर्सिटी ऑफ शेफील्ड, यूकेचे रिसर्चरने दावा केला की, टक्कल पडलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. ते म्हणाले की, केस नॅचरल पद्धतीने परत आणण्यासाठी साखरेची मदत घेतली जाऊ शकते.

डोक्यांवर केस आणणारी शुगर

फ्रंटियर्स इन फार्माकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमधून समोर आलं की, या शुगरला 2-डीऑक्सी-डी-राइबोज (2डीडीआर) म्हणूनही ओळखलं जातं. ही शुगर केसगळतीची समस्या दूर करू शकते. ही शुगर प्राणी आणि मनुष्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक बायोकेमिकल रिअॅक्शनमध्ये आधीपासून आहे.

यूकेची शेफील्ड और कॉम्सएट्स यूनिव्हर्सिटी पाकिस्तानचे वैज्ञानिक गेल्या ८ वर्षांपासून या शुगरवर रिसर्च करत होते. याच्या मदतीने नवीन ब्लड वेसल आणि जखमा भरण्याचा प्रयत्न केला जात होता.

उंदरांवर करण्यात आला प्रयोग

वैज्ञानिकांनी टेस्टोस्टेरॉनमुळे होणाऱ्या केसगळतीला रोखण्यासाठी या शुगरचा प्रयोग सगळ्यात आधी उंदरांवर केला. ज्यात त्यांना सकारात्मक रिझल्ट दिसून आला. या शुगरने केस वाढू लागले होते.

एक्सपर्टचा सल्ला

यूनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डच्या प्रोफेसर डॉ. शीला मॅकनील यांनी सांगितलं की, पुरूषांची केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी ही शुगर वापरसाठी अजून आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. 

हा रिसर्च खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण ही शुगर नॅचरल, स्वस्त आणि स्टेबल आहे. या शुगरचं जेलमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. जे केसांवर लावणंही सोपं होईल. पण सध्या याला आणखी वेळ लागेल. सध्या हा रिसर्च पहिल्या स्टेजवरच आहे.

Web Title: Men suffering from baldness study claims sugar grains can regrow hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.