रणवीर आणि शाहिदप्रमाणे बियर्ड लूक पाहिजे आहे?; फॉलो करा 'या' 10 टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:39 PM2019-04-25T16:39:02+5:302019-04-25T16:44:49+5:30
दाढी वाढवणं सध्याचा ट्रेन्ड झाला आहे. दाढीमुळे पर्सनॅलिटी बदलण्यासोबतच रूबाबदार लूक मिळण्यासाठीही मदत होते. तसेच अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाल्यानुसार, मुलीही दाढी असणाऱ्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात.
दाढी वाढवणं सध्याचा ट्रेन्ड झाला आहे. दाढीमुळे पर्सनॅलिटी बदलण्यासोबतच रूबाबदार लूक मिळण्यासाठीही मदत होते. तसेच अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाल्यानुसार, मुलीही दाढी असणाऱ्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात. दाढी वाढवण्याचा ट्रेन्ड फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही दिसून येतो. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टाइल्स फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात.
रणवीर सिंगपासून शाहीद कपूरपर्यंत तसेच नुकतचं बॉलिवूडमध्ये आपला जम बसवलेल्या विकी कौशलपासून आयुषमान खुराणापर्यंत अनेक अभिनेत्यांच्या लूकवर तरूणी जीव ओवाळून टाकतात. यामागील कारण म्हणजे फक्त त्यांचा अभिनय नव्हे तर त्यांचा दमदार लूकही आहे. लूकचं श्रेय द्यायचंच तर ते त्यांच्या दाढीलाही देणं गरजेचं आहे. तुम्हालाही या अभिनेत्यांप्रमाणे क्लासी दाढी वाढवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या पण फायदेशीर टिप्स सांगणार आहोत.
1. दररोज स्किन एक्स्फोलिएट करा. असं केल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि हेयर ग्रोथ वाढण्यास मदत होते.
2. दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा फेसवॉश किंवा कमी केमिकलयुक्त साबणाने धुवा. त्वचा स्वच्छ असेल तर हेयर ग्रोथसाठी फायदेशीर ठरतं.
3. Eucalyptus असणाऱ्या मॉयश्चरायझरचा वापर करा त्यामुळे हेयर ग्रोथ वाढते आणि क्लासी लूक मिळण्यास मदत होते.
4. भरपूर झोप घ्या. कमी झोप घेतल्याने आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच झोपेच्या कमतरतेमुळे हेयर ग्रोथवरही परिणाम होतो.
5. आपल्या डाएटवर लक्ष द्या. डाएटमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोषक तत्वांचा समावेश करा. त्यामुळे हेयर ग्रोथ उत्तम होण्यासोबतच तुमचा लूकही उत्तम दिसेल.
6. जर तुमच्या स्किनच्या रोमछिद्रांमध्ये हेयर ग्रोथ होत असेल तर त्यांच्यावर लक्ष द्या. ते दूर करणं गरजेचं असतं. नाहीतर हेयर ग्रोथ योग्य पद्धतीने होणार नाही.
7. स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. अधिक तणाव घेतल्याने केस तुटतात आणि गळण्याचं प्रमाणही वाढतं. हेयर ग्रोथवरही परिणाम होतो.
8. कमीत कमी जवळपास 6 आठवड्यांपर्यंत दाढी ट्रिम करू नका. एकदा पूर्ण ग्रोथ होऊ द्या आणि त्यांनतर तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करा.
9. दररोज तेलाने मालिश करा. फक्त लक्षात ठेवा की, यासाठी केमिकलयुक्त तेलाचा वापर करू नका. नाहीतर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
10. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर कोणी तुम्हाला सांगत असेल की, दर दुसऱ्या दिवशी शेव केल्याने चांगली दाढी येते तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.