असा तयार करा अॅपल मास्क; चेहरा दिसेल झक्कास!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:56 PM2019-02-12T19:56:45+5:302019-02-12T20:01:32+5:30
शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यसाठीही फायदेशीर ठरतं.
शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यसाठीही फायदेशीर ठरतं. अनेकदा सतत बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर घाण आणि मृत पेशी जमा होतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. अशावेळी चेहऱ्याचा ग्लो परत मिळवण्यासाठी अनेक पार्लर ट्रिटमेंट घेतल्या जातात. तर कधी बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण त्याऐवजी घरगुती किंवा नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यासोबतच चेहरा उजळण्यास मदत होते. अशातच चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अॅपल मास्कचा वापर करू शकता.
सफरचंदामध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असून त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि अॅन्टी ऑक्सिडंट आढळून येतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसेच याचे वैशिष्ट्य म्हणजे, अॅपल मास्क कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया अॅपल मास्क तयार करण्याची पद्धत आणि फायदे...
अॅपल मास्क तयार करण्याची पद्धत :
अर्धं सफरचंद कापून ते स्मॅश करून घ्या. आता त्यामध्ये क्रिम असलेलं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचं अॅपल मास्क चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी तयार आहे. आता तयार मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावून त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका.
अॅपल मास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे :
1. सनबर्न आणि टॅनिंग होत असल्यास त्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतं.
2. अॅपल मास्कमध्ये ग्लायकोलिक अॅसिड असतं. जे त्वचेवरील सर्व पोर्स स्वच्छ करण्यासोबतच मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात.
3. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिम्पल्सची समस्या दूर करण्यासाठीही अॅपल मास्क मदत करतं.
4. डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी तुम्ही अॅपल मास्क लावण्याव्यतिरिक्त अॅपल स्लाइस कापूनही डोळ्यांवर ठेवू शकता.