डार्क सर्कल दूर करण्यासाठी 'हा' स्वस्तात मस्त घरगुती उपाय कराल, तर महागड्या क्रिमचा खर्च वाचेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:34 AM2019-08-13T11:34:31+5:302019-08-13T11:44:21+5:30
डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर एक सोपा आहे. डार्क सर्कल ही नेहमीच होणारी समस्या आहे.
(Image Credit : agelessderma.com)
डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर एक सोपा आहे. डार्क सर्कल ही नेहमीच होणारी समस्या आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण सगळ्यांनाच याचा फायदा होतो असं नाही. त्वचेची योग्य काळजी न घेणे आणि पुरेशी झोप न घेणे या कारणांमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल येतात. हे दूर करण्यासाठी महिला नेहमीच बेस्ट क्रिमचा शोध घेत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट उपाय घेऊन आलो आहोत.
(Image Credit : www.livealittlelonger.com)
डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी दुधाचा उपयोग फायदेशीर ठरतो. दुधाने डार्क सर्कल सहजपणे दूर केले जातात. असा दावा आम्ही नाही तर ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात.
जसं की, आपणा सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी कसं आणि किती फायदेशीर आहे. तसंच दूध त्वचेसाठीही वरदान मानलं जातं. कारण दुधात आढळणारं व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी६ स्कीन सेल्सला पोषण देतात. त्यासोबतच दुधात व्हिटमिन बी १२ भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
(Image Credit : beautyhealthtips.in)
त्वचेसाठी दूध जास्त लाभदायक यामुळे असतं कारण यात सेलेनियम आढळतं. सेलेनियम उन्हापासून आणि फ्री रॅडिकलपासून त्वचेचं रक्षण करतं.
दुधाचा कसा कराल वापर?
१) दूध एका वाटीमध्ये घ्या आणि त्यात कॉटन पॅड भिजवून ठेवा.
(Image Credit : www.scoopwhoop.com)
२) हे कॉटन पॅड पिळून दोन्ही डोळ्यांखाली १० मिनिटांसाठी ठेवा.
३) असं तुम्ही एका दिवसात दोन ते तीन वेळा करा. नंतर पाण्याचे चेहरा स्वच्छ करा.
डार्क सर्कलपासून बचावासाठी आणखी काय?
(Image Credit : www.today.com)
त्वचेची काळजी घेण्यासोबतच काही इतरही उपाय करायला हवेत. जसे की, पुरेशी झोप घेणे, डाएटमध्ये हेल्दी फूड खाणे, हिरव्या भाज्या आणि फळं खावीत. तसेच त्वचा मॉइश्चराइज नक्की करा.