त्वचा चमकवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात 'या' ६ पैकी कोणतीही एक गोष्ट टाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 11:04 AM2018-08-11T11:04:30+5:302018-08-11T11:04:52+5:30
आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्या रोज आंघोळ करताना पाण्यात टाकल्यास तुमची त्वचा आणखी उजळते आणि चमकदार होते.
महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. महागड्या कॉस्मेटिक प्रॉडक्टपासून ते पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करणे हे केलं जातं. पण केवळ रोज आंघोळ केल्यानेच तुमची त्वचा आणखी चांगली होऊ शकते. आम्ही तुम्हाला आंघोळीच्या जेलबाबत किंवा साबणाबाबत सांगणार नाही आहोत. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्या रोज आंघोळ करताना पाण्यात टाकल्यास तुमची त्वचा आणखी उजळते आणि चमकदार होते.
१) सेंधं मीठ
आंघोळीच्या पाण्यात थोडं सेंधं मीठ घातल्यास याने त्वचेचं ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि त्वचा आतून ग्लो व्हायला लागते. एक बकेट पाण्यात एक चमचा सेंधं मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा.
२) कडूलिंबाची पाने
एका पातेल्यात एक ग्लास पाणी आणि लिंबाची ८ ते १० पाने टाका. हे पाणी चांगल्याप्रकारे उकळून घ्या. पानांचा रंग हलका झाल्यावर पाणी थंड झाल्यावर हे पाणी आंघोळी पाण्यात मिश्रित करा. या पानांमुळे स्कीन इन्फेक्शन आणि सूज कमी होते.
३) चंदन
जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर आंघोळीच्या पाण्यात चंदन मिश्रित करा. एक वाटी पाण्यात अर्धा चमचा चंदन पावडर मिश्रीत करा आणि ही पेस्ट आंघोळीच्या पाण्यात टाका. याने त्वचा ग्लो करेल आणि सोबतच स्कीन इन्फेक्शनही होणार नाही.
४) तुळशी
जर तुमच्या स्कीनला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर आंघोळीच्या पाण्यात तुळशीची काही पाने मिश्रीत करा.
५) दूध
त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात अर्धा ग्लास दूध मिश्रीत करा. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास स्कीनचा रंग आणखी उजळतो.
६) गुलाब जल
रोज रात्री झोपण्यापूर्वी कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर गुलाब जल लावा आणि सकाळी आंघोळ करताना पाण्यात २ चमचे गुलाब जल मिश्रीत करा. त्वचा ग्लो करेल आणि मुलायम सुद्धा होईल.