पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीत 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा, आठवडाभरात दिसेल फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:44 PM2024-09-19T12:44:36+5:302024-09-19T13:14:21+5:30
White Hair Problem Solution : जास्तीत जास्त लोक पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी, हेअर डाय आणि हेअर कलरचा वापर करतात. पण यातील केमिकल्समुळे केस डॅमेजही होऊ शकतात.
White Hair Problem Solution : कमी वयातच केस पांढरे होणे ही आजकाल अनेकांची समस्या झाली आहे. सामान्यपणे केस वाढत्या वयात पांढरे होत असतात. पण आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे केस लवकर पांढरे होत आहेत. अशात लोक केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. पण याचे अनेक साइफ इफेक्ट्सही असतात. हे साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी तुम्ही काही नॅचरल घरगुती उपायही करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जास्तीत जास्त लोक पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी, हेअर डाय आणि हेअर कलरचा वापर करतात. पण यातील केमिकल्समुळे केस डॅमेजही होऊ शकतात. त्यामुळे एक नॅचरल उपाय तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला हळदमध्ये एक गोष्टी मिक्स करून वापरावी लागेल.
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यात आयर्न, कॉपर आणि इतरही अनेक औषधी गुण असतात. जे तुमचे केस काळे करण्यास मदत करतात. हळदीच्या मदतीने तुम्ही केस नॅचरली काळे आणि चमकदार करू शकता. महत्वाची बाब म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही होत नाहीत.
कसा कराल वापर?
हा खास नॅचरल हेअर पॅक तयार करण्यासाठी एक चमचा हळद आणि दोन चमचे आवळा पावडर घ्या. आता या दोन्ही गोष्टी एका लोखंडी कढईमध्ये त्यांचा रंग काळा होईपर्यंत भाजून घ्या. नंतर एका भांड्यात काढून थंड होऊ द्या. नंतर या पावडरमध्ये एलोवेरा जेल टाकून चांगलं मिक्स करा. हे मिश्रण केसांवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक दिसेल.