मोहरीच्या तेलात 'या' २ गोष्टी मिक्स करून लावा, केसगळतीही थांबेल आणि चमकदारही होतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:53 AM2024-11-16T10:53:35+5:302024-11-16T10:54:14+5:30
या तेलाने डोक्याच्या त्वचेला खूप पोषण मिळतं आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. या तेलाने डोक्याची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.
Hair Care : मोहरीच्या तेलाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. सोबतच मोहरीच्या तेलाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तसेच मोहरीचं तेल केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतं. या तेलात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात कॅल्शिअम आणि आयर्नही भरपूर असतं. या तेलाने डोक्याच्या त्वचेला खूप पोषण मिळतं आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. या तेलाने डोक्याची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अशात या तेलात दोन गोष्टी मिक्स करून लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते आणि केस मजबूत होतात.
केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात कलौंजी आणि मेथीचे दाणे मिक्स करावे. एका वाटीत तेल गरम करा. यात एक चमचा कलौंजी आणि एक चमचा मेथीचे दाणे टाकावे. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावा याने केसगळतीची समस्या दूर होईल. तसेच केस मजबूत होतील.
तेलातील पोषक तत्व
काळ्या कलौंजीच्या बियांमध्ये आवश्यक पोषक तत्व, खनिज आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे केसांसाठी फायदेशीर असतात. या बियांमुळे डोक्याच्या त्वचेला अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही मिळतात. त्याशिवाय कलौंजीच्या बियांमुळे केसांना नॅचरल कलरही मिळतो. जर नियमितपणे या बियांचा वापर केला तर केस कधीच पांढरे होणार नाहीत. अशात या बीया मोहरीच्या तेलात गरम करून डोक्याची मालिश केली पाहिजे.
तसेच मेथी दाण्यांनी केसांना वेगवेगळे फायदे होतात. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-फंगल आणि फ्लेवेनॉइड्स गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. कोंडाही दूर होतो.
कसा कराल वापर?
मोहरीचं तेल केसांवर वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता. एक कप दह्यात एक चमचा मोहरीचं तेल टाकून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क केसांवर लावल्याने भरपूर फायदे मिळतात. खासकरून केस चमकदार आणि मुलायम करण्यसाठी हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो.
दही, अॅलोवेरा, मध आणि मोहरीचं तेल मिक्स करून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क अर्धा तास केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.