त्वचेच्या आरोग्यासाठी रामबाण आहे 'या' फुलांचा फेसपॅक, बाजारातील प्रोडक्ट्सना कराल बाय बाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:10 PM2022-08-03T22:10:15+5:302022-08-03T22:12:38+5:30
उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या मोगऱ्याची (Jasmin Flower) फुलंही त्वचेची निगा राखण्यासाठी उपयुक्त मानली जातात. त्याच्या सुगंधामुळे (Pleasant Smell) मन शांत होतं. त्वचेच्या आरोग्यासाठी मोगऱ्याचा वापर करून विविध उपाय करता येतात.
त्वचेची निगा राखण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. हळद, चंदन, मुलतानी माती हे घटक त्वचेसाठी उत्तम मानल्या गेल्या आहेत. इतकंच नाही, तर काही फुलंही त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या मोगऱ्याची (Jasmin Flower) फुलंही त्वचेची निगा राखण्यासाठी उपयुक्त मानली जातात. त्याच्या सुगंधामुळे (Pleasant Smell) मन शांत होतं. त्वचेच्या आरोग्यासाठी मोगऱ्याचा वापर करून विविध उपाय करता येतात. 'लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम'ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जाई-जुई अर्थात Jasmine च्या कुळातली सगळीच फुलं खूप सुंदर असतात आणि त्यांचा गंधही खूप छान असतो. त्यात जाई, जुई, मोगरा, कुंडुमल्लीगई, अरेबियन जास्मिन, चमेली, मदनबाण, सायली, कुंद, मल्लिका अशा अनेक वेगवेगळ्या फुलांचा समावेश आहे. ही सारी जाई-जुईच्याच कुळातली, मात्र वेगवेगळी फुलं आहेत. त्यापैकी बहुतांश फुलांचा रंग पांढरा असतो, फुलांना सुंदर गंधही असतो; मात्र प्रत्येक फुलाची रचना वेगळी असते. सौंदर्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा वापर कोणत्या प्रकारे करता येतो याची माहिती आता घेऊ या. मोगऱ्यामध्ये मॉयश्चरायिंग गुणधर्म असतात. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याचा वापर केला जातो.
दुर्गंध घालवण्यासाठी
मोगऱ्याला खूप छान सुगंध असतो. त्यामुळे सुगंधी उत्पादनांमध्ये मोगऱ्याचा भरपूर वापर केला जातो. शरीराचा दुर्गंध घालवण्यासाठीही (Body Odour) मोगरा वापरता येतो. घरच्या घरी मोगऱ्यापासून बॉडी स्प्रे तयार करू शकता. त्यासाठी जास्मिन इसेन्शियल ऑइल उत्तम ठरतं. एका स्प्रेच्या बाटलीत पाणी आणि चमेलीचं तेल एकत्र करा. त्याचा उपयोग बॉडी स्प्रे म्हणून करता येईल.
नितळ त्वचेसाठी
मोगऱ्याच्या फुलाची पेस्ट त्वचेवर लावल्यानं त्वचा नितळ आणि मऊ होते. मोगऱ्याचा अर्क असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करता येऊ शकतो.
मुरमं घालवण्यासाठी
पावसाळ्यात चेहऱ्यावर मुरमं (Pimples) येण्याची समस्या अनेकांना भेडसावते. अशा वेळी मॉयश्चरायझर लावण्याची भीती वाटत असेल, तर मोगऱ्याच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करून ती चेहऱ्याला लावल्यानं मुरमं दूर होतात.
फेस पॅक म्हणून
मोगऱ्याच्या पाकळ्यांचा वापर फेस पॅक म्हणूनही करता येतो. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा.
आंघोळीसाठी वापर
मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध मन प्रफुल्लित करतो. आंघोळीच्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं किंवा पाकळ्या घातल्या तर रिफ्रेशिंग वाटतं. दररोज अशा पाण्यानं आंघोळ केल्यावर ताजंतवानं वाटतं. मोगऱ्याच्या पाकळ्यांची पेस्टही पाण्यात मिसळता येऊ शकते किंवा मोगऱ्याचा अर्कही घातला तरी चालतो. प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा खराब होते. त्यावरही मोगऱ्याच्या फुलांची पेस्ट उपयोगी ठरते.
केसांच्या कंडिशनिंगसाठी
मोगऱ्याचा गजरा केसात माळला जातो. पारंपरिक पेहरावात मोगरा केसांचं सौंदर्य खुलवतो; मात्र मोगरा केसांच्या कंडिशनिंगसाठीही (Conditioner) उत्तम असतो. यासाठी मोगऱ्याची फुलं गरम पाण्यात भिजवून ठेवा. थंड झाल्यावर या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. यामुळे केस सुंदर मुलायम बनतील.
मोगऱ्याचं फूल थंडावा देणारं असतं. उन्हाळ्यात माठातल्या पाण्यात वाळ्याप्रमाणेच मोगऱ्याचं फूलही घालतात. याच गुणधर्मामुळे मोगऱ्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो.