शरीराच्या या ४ भागांवर तीळ असणे मानलं जातं शुभ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 12:13 PM2018-04-06T12:13:47+5:302018-04-06T12:16:50+5:30

चेहरा आणखी आकर्षक करणारा काळा तीळ हा शूभ आणि अशूभही मानला जातो. जर तुमच्या शरीराच्या काही अंगावर तीळ असल्यास काय होतं, हे जाणून घेऊया.

Moles on your face and what they mean | शरीराच्या या ४ भागांवर तीळ असणे मानलं जातं शुभ !

शरीराच्या या ४ भागांवर तीळ असणे मानलं जातं शुभ !

googlenewsNext

शास्त्रांमध्ये शरीरावरील तीळांना खूप महत्व असल्याचे सांगण्यात आले आहे. शरीराच्या कोणत्याही अंगावर लाल तीळ असल्यास ते शूभ आणि फलदायक मानलं जातं. पण चेहरा आणखी आकर्षक करणारा काळा तीळ हा शूभ आणि अशूभही मानला जातो. जर तुमच्या शरीराच्या काही अंगावर तीळ असल्यास काय होतं, हे जाणून घेऊया. समुद्रशास्त्रात तीळ अंगावर असण्याचे कारण सांगत त्यांच्या शुभ असण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

हातावर तीळ:

हातावर तीळ असणं शुभ मानलं जातं. समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातावर तीळ असतो ते लोक खूप लकी असतात. त्यांच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट चांगली होते असं मानलं जातं. असे लोक खूप धनवान असल्याचेही मानले जाते. यासोबतच ज्या घरांमध्ये अशा मुली दिल्या जातात. त्या घरांमध्ये कधीही संपत्तीची कमतरता राहत नाही, अशीही मान्यता आहे.

नाकावर तीळ:

ज्या लोकांच्या नाकावर तीळ असतो, ते लोक मनाने खूपच चांगले मानले जातात. असे लोक प्रत्येक काम ख-या मार्गाने करतात. ज्यामुळे ते करिअरमध्ये मोठ्या उंचीवर पोहोचतात. ज्या लोकांच्या नाकावर तीळ असतो, त्यांना यश नक्की मिळतं असे मानले जाते, भलेही त्यात थोडा उशीर लागू शकतो.

पाठीवर तीळ:

ज्या लोकांच्या पाठीवर तीळ असतो ते लोक जास्त रोमॅंटिक असल्याचे बोलले जाते. अशा लोकांना मोकळ्या वेळात फिरायला खूप आवडतं. हे लोक एखादी गोष्ट मिळवण्याचा निश्चय करतात आणि ती गोष्ट ते कोणत्याही परिस्थीतीत मिळवतात. असे लोक आपल्या परिवारावर खूप प्रेम करतात, असे लोक नेहमीच आनंदी असतात. त्यामुळे त्यांचं नशीब नेहमीच चमकत असतं.

हनुवटीवर तीळ:

ज्या लोकांच्या हनुवटीवर तीळ असतो ते लोक प्रत्येक कामात यश मिळवतात. अशा लोकांना वेळेनुसार आणि काळानुसार कसं चालावं हे कळतं. तसेच ज्या लोकांच्या हनुवटीच्या एकदम मधोमध तीळ असतो त्या लोकांचं त्यांच्या पार्टनरसोबत खूप चांगलं पटतं. सोबतच असे लोक फायनॅन्शिअलीही खूप स्ट्रॉंग असतात. प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं.

Web Title: Moles on your face and what they mean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.