स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:16 PM2019-08-16T16:16:24+5:302019-08-16T16:16:45+5:30
बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही योग्य काळजी घेऊन या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्किन टाइपनुसार, काही सोप्य टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही बदलत्या वातावरणात त्वचेची काळजी घेऊ शकता. तसेच स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका करू शकता.
नॉर्मल स्किन
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सल्फेट फ्री फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल आणि चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेमध्ये मॉयश्चर आणि पीएच लेव्हल मेन्टेन राहण्यासाठी हलक्या टोनरचा वापर करा. याव्यतिरिक्त ड्राय पेशी हटवण्यासाठी ग्लायकोलिक अॅसिड सीरम आणि हलकं मॉयश्चरायझर यूज करा.
ड्राई स्किन
ड्राई स्किनमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा यामुळे पिंपल्ससारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अशातच ड्राय स्किनसाठी असे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं असतं, ज्यामुळे त्वेचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सकाळी त्वचेवर मॉयश्चरायझर आणि टोनरचा वापर करा. याव्यतिरिक्त त्वचेमधील कोलेजन तुटण्यापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि अॅन्टीऑक्सिडंट सीरमचा वापर करा.
ऑयली स्किन
जर तुमची स्किन ऑयली असेल तर सकाळी क्लिंजिंग ऑइलच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर टोनरच्या मदतीने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमध्ये असलेलं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं. तसेच असं मॉयश्चराझर वापरा ज्यामध्ये सोडिअम पीसीए आणि ग्लिसरीनचे प्रमाण अधिक असेल. याव्यतिरिक्त त्वचेवर झिंक ऑक्साइड सनस्क्रिन लोशनचा वापर करा.
खूप पाणी प्या
सकाळी दोन ग्लास पाण्याऐवजी दिवसभरामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध एकत्र करून पिऊ शकता. यामुळे बॉडी आणि त्वचेमध्ये असलेले विषारी टॉक्सिन्स निघून जातील आणि त्वचेचा ग्लो वाढेल. याव्यतिरिक्त तुम्ही ग्रीन टी किंवा नारळाचं पाणीही पिऊ शकता.
मॉयश्चरायझर, टोनर आणि सनस्क्रिन
सूर्याची यूवी किरणं त्वचेचा टेक्चर खराब करतात. यापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन व्यतिरिक्त मॉयश्चरायझर आणि टोनर लावणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे तुम्ही स्किन कॅन्सरपासूनही बचाव करू शकता. पण या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी तुमचा स्किन टाइप जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं.
त्वचेची काळजी घेण्यासाठी इतर टिप्स :
- जर तुम्हाला वेळेआधीच वाडत्या वयाची लक्षणं दिसू लागली तर सीरमचा टोनिंग रूटिनमध्ये समावेश करा.
- सीरम अप्लाय केल्यानंतर मॉयश्चरायझर आणि सनस्क्रिन क्रिम लावा.
- घरातून बाहेर गेल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तास आधी सनसक्रीन लावा आणि प्रत्येक 2 ते 3 तासांनी वापर करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.