उन्हाळ्यात मोसंबीच्या रसाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 10:27 AM2018-05-02T10:27:48+5:302018-05-02T10:27:48+5:30
केवळ उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळीही मोसंबीच्या रसाचे अनेक आरोग्यादायी फायदे होतात. ते काय आहेत हे खालीलप्रमाणे बघता येतील.
मुंबई : उन्हाळ्यात गरमीपासून सुटका मिळवण्यासोबत आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळी फळे आणि त्यांच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या मोसंबीच्या रसाचाही समावेश आहे. केवळ उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळीही मोसंबीच्या रसाचे अनेक आरोग्यादायी फायदे होतात. ते काय आहेत हे खालीलप्रमाणे बघता येतील.
- मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.
- मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
- सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात.
(बटाट्याच्या रसाचे हे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क)
- मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो.
- मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.
- पचनक्रिया चांगली राहण्यासाठीही मोसंबीचा रस फायदेशीर आहे. आपल्या सुंगधाने आणि अॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रिया चांगली ठेवतो.
- रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त संचार योग्यप्रकारे होतो. मोसंबीचा रस आपली रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते. याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते.
(डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे)
- मोसंबीमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याचा वजन कमी करण्यातही मदत होते. मोसंबीचा रस मधासोबत प्यायल्यास वजन कमी होऊ शकतं.
- डोळ्यांसाठीही मोसंबीचा रस फायदेशीर मानला जातो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब टाकून डोळे धुतल्यास कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला आराम मिळेल.
- मोसंबीचा रस चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि काळे डाग निघून जातील.
- मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त स्वच्छ होतं. यामुळे त्वचेचा रंगही उजळतो.
-मोसंबीचा रस पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते.